Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC News: “त्या” 259 कामगारांना आम्ही न्याय देणार, कामगारमंत्री आकाश फुंडकर यांचे आश्वासन

भाजपचे माजी आमदार आणि महाराष्ट्र परिश्रम कामगार संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने मुंबईत ही बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये कामगार मंत्री फुंडकर यांनी कंपनी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारावर ताशेरे ओढवले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 25, 2025 | 07:30 PM
"त्या" 259 कामगारांना आम्ही न्याय देणार, कामगारमंत्री आकाश फुंडकर यांचे आश्वासन (फोटो सौजन्य-X)

"त्या" 259 कामगारांना आम्ही न्याय देणार, कामगारमंत्री आकाश फुंडकर यांचे आश्वासन (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण :अंबरनाथच्या मिरॅकल कंपनीतील त्या 259 अन्यायग्रस्त कामगारांना आम्ही नक्कीच न्याय देऊ असे आश्वासन राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज दिले. भाजपचे माजी आमदार आणि महाराष्ट्र परिश्रम कामगार संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने मुंबईत ही बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये कामगार मंत्री फुंडकर यांनी कंपनी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारावर ताशेरे ओढत या बैठकीबाबत पूर्वसूचना देऊनही कंपनी मालक त्याला अनुपस्थित राहिल्याबद्दल संताप व्यक्त केला.

फिनोलेक्स केबल्सकडून पुण्यातील पालखी सोहळ्याला सातव्यांदा पाठिंबा; वारकरी समुदायासाठी सेवा उपक्रम राबवले

अंबरनाथमधील मिरॅकल केबल कंपनीने बेकायदेशीरपणे काढून टाकलेल्या 259 कामगारांना पुन्हा कामावर घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र परिश्रम संघ या कामगार संघटनेतर्फे गेल्या काही महिन्यांपासून कायदेशीर लढा सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज कामगार मंत्र्यांच्या प्रमूख उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक आज पार पडली.

अंबरनाथच्या या मिरॅकल केबल कंपनी व्यवस्थापनाने गार्डनिंग, पॅकेजिंग आणि हाउस क्लिनिंगच्या नावाखाली अडीचशेहून अधिक कामगारांची भरती केली. आणि या कामगारांकडून कंपनीतील मुख्य स्वरूपाचे काम करून घेतले जात होते. तसेच किमान वेतन, आरोग्य विमा, भविष्य निर्वाह निधी असे कामगार कायद्यातील कोणतेही फायदे या कर्मचाऱ्यांना दिले जात नव्हते. एकप्रकारे या कंपनी व्यवस्थापनाकडून या कामगारांची अन्यायकारक पिवळणूक केली जात असल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कामगार मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले, तसेच कंपनी व्यवस्थापनाची ही चोरी पकडली गेल्यानंतर या 259 कामगारांना अन्यायकारक पद्धतीने तडकाफडकी कामावरून काढून टाकण्यात आले असून त्याविरोधात गेल्या 3 महिन्यांपासून लढा सुरू असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.

हे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी कंपनी व्यवस्थापनाच्या प्रतिनिधीला चांगलेच फैलावर घेतले. आजच्या बैठकीची माहिती असूनही मालक याठिकाणी उपस्थित का राहिले नाहीत असा संतप्त सवाल केला. त्यावर आजारपणाचे कारण पुढे करत कंपनीमालक या बैठकीला उपस्थित राहिले नसल्याचे या प्रतिनिधीद्वारे सांगण्यात आले. तसेच पुढच्या बैठकीला जर कंपनी मालक उपस्थित राहिले पाहिजेत. ते आले नाहीत तर आम्हाला कायदेशीर मार्गाने हिसका दाखवावा लागेल अशी तंबीही कामगार मंत्री फुंडकर यांनी कंपनी व्यवस्थापनाच्या प्रतिनिधीला दिली. तर या बैठकीला उपस्थित असलेल्या अंबरनाथ मॅन्यूफॅक्चरिंगचे असोसिएशनचे अध्यक्षही कंपनी प्रतिनिधीसोबत उपस्थित होते. परंतू या बैठकीशी तुमचा कोणताही संबंध नसल्याचे सांगत कामगार मंत्र्यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. आणि या अन्यायग्रस्त कामगारांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून त्यांना नक्कीच न्याय मिळवून देण्यात येईल असे आश्वासन यावेळी कामगार राज्यमंत्री आकाश चौधरी यांनी दिले असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली. या बैठकीला भाजपा प्रदेश महामंत्री आमदार विक्रांत पाटील, महाराष्ट्र परिश्रम संघ सचिव दिलीप कुमार मुंढे हेदेखील उपस्थित होते.

मोठी बातमी! माळेगाव कारखाना निवडणुकीचा सस्पेन्स संपला; चुरशीच्या लढतीनंतर दादाच ठरले ‘बॉस’

Web Title: We will deliver justice to the 259 workers of miracles company in ambernath assurance by labour minister akash fundkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 07:30 PM

Topics:  

  • kalyan
  • kalyan news
  • KDMC

संबंधित बातम्या

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪
1

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Dombivali MIDC : नाल्यात सोडलेल्या गुलाबी पाण्याचं प्रकरण काय ? व्हायरल व्हिडिओचं सत्य उघड
2

Dombivali MIDC : नाल्यात सोडलेल्या गुलाबी पाण्याचं प्रकरण काय ? व्हायरल व्हिडिओचं सत्य उघड

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना
3

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव
4

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.