फोटो सौजन्य - Social Media
भारतातील आघाडीची विद्युत आणि संप्रेषण केबल उत्पादक कंपनी फिनोलेक्स केबल्सने आपल्या मूळ पुणे शहरातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला मान देत, यंदाही प्रसिद्ध पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी समुदायाला पाठिंबा दिला आहे. हा उपक्रम कंपनीकडून सलग सातव्या वर्षी राबवण्यात आला असून, भक्तीभावाने नटलेल्या या यात्रेला सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेने समृद्ध करण्यात आला आहे.
शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या आणि लाखो भाविक सहभागी होणाऱ्या या पालखी यात्रेमध्ये, देहू आणि आळंदी येथून वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात. यंदाची यात्रा शुक्रवारी सकाळपासून सुरू झाली असून, फिनोलेक्स केबल्सने वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रत्यक्ष मदत केली. यामध्ये पिशव्या, गांधी टोपींचं वाटप करण्यात आलं, जेणेकरून प्रवास अधिक सुकर आणि सुरक्षित व्हावा.
या उपक्रमामागे कंपनीची पुण्याशी असलेली बांधिलकी आणि स्थानिक समुदायांप्रती असलेली कृतज्ञता आहे. पुणे हे फिनोलेक्स केबल्सचं मूळ शहर असून, त्यांनी आपल्या वाढीस हातभार लावणाऱ्या लोकांना आणि संस्कृतीला काहीतरी परत देणं ही आपली जबाबदारी मानली आहे.
फिनोलेक्स केबल्सचे अध्यक्ष (विक्री आणि विपणन) अमित माथूर यांनी सांगितले की, “पालखी ही भक्ती, सहनशीलता आणि समुदायभावनेचं सजीव प्रतीक आहे. पुणेस्थित ब्रँड म्हणून, ज्यांनी आमचं अस्तित्व घडवायला मदत केली त्या लोकांप्रती आणि संस्कृतीप्रती आम्ही कृतज्ञ आहोत आणि त्यांच्यासाठी काहीतरी परत देणं ही आमची जबाबदारी मानतो.” “पालखी दरम्यान आमचे प्रयत्न हे वारकऱ्यांप्रती आमच्या ऐक्याचे एक छोटंसं प्रतीक आहेत.”
कंपनी नेहमीच व्यवसायिक प्रगतीसोबत सामाजिक दायित्व जोपासत आली आहे. पालखीसारख्या परंपरेला पाठिंबा देऊन फिनोलेक्स केबल्स परंपरा आणि प्रगती यांच्यातील दुवा बनण्याचे कार्य करत आहे. हे उपक्रम भविष्यातील समावेशक समाज आणि एकजूट निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.