बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा ; विदर्भासह मराठवाडा आणि घाट परिसरात पावसाची शक्यता
पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून ते अधिक तीव्र होताना दिसत आहे. ही प्रणाली पश्चिम-वायव्य दिशेने सरकत असल्याने तिचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चक्रीवादळ तयार झाल्यास त्याला ‘अर्णव’ हे नाव दिले जाणार आहे. महाराष्ट्रासोबतच आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर या स्थितीचा परिणाम होण्याचा अंदाज आहे.
उद्या (२७ ऑक्टोबर) गडचिरोली जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांना पाऊस आणि वादळी वाऱ्यासह पावसची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहू शकतो.
२८ ऑक्टोबरला विदर्भातील इतर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय उर्वरित महाराष्ट्राच्या इतर भागांमध्येही पावसाची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Sant Namdev Jayanti: संत नामदेव यांची जयंती जाणून घ्या २६ ऑक्टोबरचा इतिहास..
दुसरीकडे कोल्हापूरच्या घाट परिसरासह, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांत मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा अंदाज आहे.
२९ ऑक्टोबरला रत्नागिरी, नाशिक घाटमाथा, पुण्याचा घाटमाथा परिसर, साताऱ्याचा घाटमाथा परिसर या भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाच्या अद्ययावत अंदाजानुसार पावसाचा इशारा लागू होऊ शकतो. हवामानात होणाऱ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे.
Ans: बंगालच्या उपसागरातील या कमी दाबाच्या प्रणालीचे चक्रीवादळात रूपांतर झाल्यास त्याला 'अर्णव' (Cyclone Arnab) हे नाव दिले जाईल.
Ans: २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ (गडचिरोली, चंद्रपूर आदी), मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा अंदाज आहे.
Ans: २७ ऑक्टोबर रोजी विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याला विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसासाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.






