Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पूजा खेडकरांचे नक्की चाललयं काय?; पुणे पोलिसांची नोटीसही धुडकावली

पूजा खेडकर यांचे कारनामे समोर आल्यानंतर त्यांचे प्रशिक्षण थांबवण्यात आले आहे. पण त्यांच्यावर केलेली ही कारवाई पुरेशी नाही, त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.  इतकेच नव्हे तर, त्यांनी ज्या प्रकारे प्रशासनाची फसवणूक केली. त्यावरून त्यांच्या फौजदारी गुन्हा दाखल करण्याची  मागणी  माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 19, 2024 | 09:50 AM
Pooja Khedkar

Pooja Khedkar

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रताप दररोज समोर येत आहेत. पण त्यांची अरेरावी संपण्याचे काही नाव घेत नाहीये. पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावून त्यांना पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण पूजा यांनी मात्र पुणे पोलिसांची नोटीसच धुडकावून लावली आहे.

पुण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पूजा यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली. डॉ. दिवसे यांच्या आरोपांसंदर्भात लेखी जबाब नोंदवण्यासाठी पुणे पोलिसांनी त्यांना नोटीस बजावून पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले. पण तरीही त्या अद्यापही वाशिममधील शासकीय विश्रामगृहात मुक्कामी असून त्यांनी विश्रामगृहात राहण्याची मुदत वाढवून घेतली आहे. त्यामुळे त्या जबाब नोंदवण्यासाठी पुणे आयुक्त कार्यालयात जाणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांनी उद्या सकाळपर्यंत विश्रामगृहात राहण्यासाठी मुदत वाढवून घेतली आहे. त्यामुळे त्या आज सांयकाळी वाशिमहून निघण्याची शक्यता आहे. त्या पुणे किंवा थेट दिल्लीकडे रवाना होऊ शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. पण गेल्या दोन-तीन दिवसात त्यांनी यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.

खरेतर, पुणे पोलिसांची नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी गुरूवारीच पुण्याला जाणे अपेक्षित होते. पण त्यांच्या हालचाली पाहता खेडकर त्यांनी पुणे पोलिसांची नोटीस धुडकावल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे  जबाब नोंदवण्यासाठी पूजा खेडकर पुणे आयुक्त कार्यालयात जाणार का, अशी  शंका व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पूजा खेडकर यांचे कारनामे समोर आल्यानंतर त्यांचे प्रशिक्षण थांबवण्यात आले आहे. पण त्यांच्यावर केलेली ही कारवाई पुरेशी नाही, त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.  इतकेच नव्हे तर, त्यांनी ज्या प्रकारे प्रशासनाची फसवणूक केली. त्यावरून त्यांच्या फौजदारी गुन्हा दाखल करण्याची  मागणी  माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे.

Web Title: What exactly is going on with pooja khedkar the pune police notice was also rejected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2024 | 09:50 AM

Topics:  

  • crime news
  • political news
  • Puja Khedkar
  • pune news

संबंधित बातम्या

फोन करुन प्रेयसीला भेटायला बोलावले, नंतर गायरानामध्ये नेले अन्…; सासवडमधील धक्कादायक प्रकार
1

फोन करुन प्रेयसीला भेटायला बोलावले, नंतर गायरानामध्ये नेले अन्…; सासवडमधील धक्कादायक प्रकार

Karjat News : आत्महत्या की घातपात? दोन्ही अपत्ये मुली म्हणून सासरी जाच, मृतदेहावर संशयास्पद खुणा; पीडितेच्या वडिलांचा आरोप
2

Karjat News : आत्महत्या की घातपात? दोन्ही अपत्ये मुली म्हणून सासरी जाच, मृतदेहावर संशयास्पद खुणा; पीडितेच्या वडिलांचा आरोप

आधी महिलेने पोटच्या मुलीचा गळा दाबला, अन् नंतर मुलाला…; मंचरमधील धक्कादायक प्रकार
3

आधी महिलेने पोटच्या मुलीचा गळा दाबला, अन् नंतर मुलाला…; मंचरमधील धक्कादायक प्रकार

Pune News : अवकाळी पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा; १२ तालुक्यांतील १०५ गावे बाधित, दोघांचा मृत्यू
4

Pune News : अवकाळी पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा; १२ तालुक्यांतील १०५ गावे बाधित, दोघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.