ऑनलाईन गेमिंग अँप्सच्या (Online Gaming App) माध्यमातून अल्पवयीन हिंदू मुलांना हेरून त्यांचे धर्मातर (conversion ) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच गाझियाबादमध्ये उघडकीस आला. या प्रकरणाचे धागेदोरे गाझियाबादपासून ठाण्याच्या मुंब्यापर्यंत पोहोचले असुन आता या प्रकरणी गाझियाबाद पोलीस पथकांनी मुंब्रा,नवी मुंबई, मुंबई परिसरात १० ठिकाणी छापे टाकले आहेत. मात्र, या निमित्ताने गेमींग जिहाद हा विषय चर्चेला आला आहे. काय आहे गेमींग जिहाद? या द्वारे खरंच कुणालाही रूपांतरित केले जाऊ शकते? जाणून घ्या.
[read_also content=”आधी मित्राने केला अत्याचार; नतंर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मित्रांनाही केलं सामिल, अल्पवयीन मुलीवर 6 जणांचा अत्याचार https://www.navarashtra.com/crime/minor-girl-sexually-assaulted-by-6-people-in-chhatrapati-sambhaji-nagar-nrps-413385.html”]
गाझियाबादमधील एका व्यक्तीने मौलवी आणि अन्य एका व्यक्तीवर त्याच्या मुलाचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप केल्यावर ऑनलाइन धर्मांतराची घटना उघडकीस आली. या प्रकरणी गाझियाबाद पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. हिंदू कुटुंबातील हा मुलगा नमाज पढताना आढळल्याने कुटुंबियांनी त्याला हटकले मात्र मुलाने सांगितले की, जर तुम्ही मला घराबाहेर काढले तर मी मशिदीत राहीन. त्याचे म्हणणे ऐकून कुटुंबीय पोलिसात पोहोचले. त्यानंतर या प्रकरणी एका मौलवीस अटक करण्यात आली आहे. या मौलवीने दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन गेमिंग अँप्सच्या माध्यमातून धर्मांतर घडवण्याच्या कटाचा मास्टर माईंड जिहादी शाहनवाज उर्फ बद्दो असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिहादी शाहनवाज उर्फ बद्दो हा फोर्ट नाइट गेम (Fortnite) आणि डिस्कॉर्ड (Discord) या दोन अप्सवर हिंदू नावाने फेक आयडी बनवून अल्पवयीन तरुणांच्या गेमिंग ग्रुपमध्ये सामील व्हायचा. तो गेम खेळण्यासाठी अल्पवयीन मुलांना विविध ट्रिक शिकवायचा. त्यात तो मुलांना धार्मिक प्रार्थना म्हणायला लावायचा आणि जिंकून द्यायचा. तुम्ही प्रार्थना म्हटली तर गेम सहज जिंकू शकता, असे तो मुलांना आवर्जून सांगायचा. त्यातून मुलांना पैसे मिळू लागल्याने त्यांचे हे आकर्षण दिवसेंदिवस वाढत गेले आणि हळूहळू ही मुले सहज इस्लाम स्विकारू लागली.
ऑनलाईन गेमिंग अप्सवरून जाळ्यात अडकलेल्या मुलांना जिहादी शाहनवाज ऊर्फ बद्दो व त्याचे सहकारी काही व्हिडीओ व लिंक शेअर करून ते पाहण्यास भाग पाडत… त्यात जिहादी झाकीर नाईक याच्यासह एका यूट्यूब चॅनेलची लिंक पाठवली जाई… गाझियाबाद पोलिसांनी या चॅनेलची पडताळणी केली असता ते इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधून हाताळले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाच प्रकारे मुंब्रा शहर व अनेक ठिकाणच्या ४००हून अधिक मुलांचे त्याने धर्मांतर (conversion) घडवल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. त्यातील २ मुले मुंब्रा परिसरातील तर १ जण मुंबईतील असल्याची माहिती समोर आली आहे.
ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून मुलांचे धर्मांतर करण्याचा हा सारा खेळ टप्पा टप्प्याने होत असल्याची माहिती समोर आली आहे. या चा पहिला टप्पा म्हणजे मुलांसोबत ऑनलाइन गेम खेळणे. दुसऱ्या टप्प्यात अॅपच्या माध्यमातून मुलांशी चॅटिंग करून त्यांना इस्लामचे फायदे सांगत होते. तसेच, या मुलाला सांगण्यात आले की जर त्याने कुराणच्या आयतींचे पठण केले तर तो जिंकेल. त्यामुळे लहान मुलं सुद्धा त्यांनी सांगितलेलं करायचे. त्यांनतर त्यांना जिंकूनही दिले जात होते. त्यामुळे मुलांचा विश्वास वाढत जाऊन मुस्लिम धर्माकडे कल वाढत जात होता. जेव्हा मुलाचा इस्लामकडे कल वाढतो आणि तो मुस्लिम बनण्यास तयार होतो, तेव्हा शेवटी त्याच्याकडून प्रतिज्ञापत्र केले जाते. या प्रतिज्ञापत्रात मुलाने स्वतःच्या इच्छेने इस्लाम स्वीकारत असल्याचे लिहायला लावले आहे.