कर्जत तालुक्यातील ठेकेदारांचे विविध शीर्षका अंतर्गत 204 कोटी रुपयांची बिले मागील तीन वर्षांपासुन प्रलंबित आहेंत. त्यामुळे ठेकेदारांची आर्थिक स्तिथी खालवली असून विकास कामे करण्यासाठी घेतलेल्या कर्जावर बँकेचे वाढणारे व्याज आणि उधारी मिळावी यासाठी सप्लायर्स नी लावलेला तगादा यामुळे ठेकेदार मेटाकुटीला आले आहेत.दरवर्षी मार्च अखेर रखडलेली बिले मिळतातच. त्यासाठी मार्च अखेरीस ठेकेदार आशेने पाहत असतात. अधिकारी वर्गाने शासना कडे पाठपुरावा करून भरीव निधी आणावा या करिता कर्जत तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष राहुल डाळिंबकर यांनी मागील आठवड्यात आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण यांनी मी दोन दिवसात भरीव निधी आणील असे आश्वासन कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या समोर देऊन उपोषण सोडण्यास भाग पाडले होते,मात्र दोन दिवसात कोणत्याही कामाचे बिल ठेकेदारांना मिळाले नाही.
त्यामुळे ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण यांच्याकडून एक रुपया देखील निधी मिळाला नाही. त्यामुळे अखेर कर्जत तालुक्यातील ठेकेदारांनी कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण यांच्या कार्यलयात केबिन मध्ये बसून ठिय्या आंदोलन सुरु केले. त्या ठेकेदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वत्र खळबळ माजली असून ठेकेदार आपल्या ठकीत बिलासाठी कोणती भूमिका घेणार? याचा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेंगा दाखवला हे पाहून अनेक ठेकेदारांनी संताप व्यक्त केला आहे.






