Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut PC:  ‘ज्यावेळी महिलांची नग्न धिंड …; मोदींच्या मणिपूर दौऱ्यावरून राऊतांचा जहरी सवाल

मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, " तुमच्याकडे पत्रकार परिषदेसाठी जागा नसेल तर आम्ही शिवसेना भवनात, पत्रकार परिषदेसाठी जागा देऊ, पण यावर पत्रकार परिषद घ्या.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 13, 2025 | 12:33 PM
'When women were being stripped naked...'; Raut's direct question on Modi's Manipur visit

'When women were being stripped naked...'; Raut's direct question on Modi's Manipur visit

Follow Us
Close
Follow Us:
  • मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत आजही समाजात मोठा संभ्रम
  • देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेऊन उत्तरे द्यावीत
  • मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली जात होती, तेव्हा मोदीजी कुठे होते

Sanjay Raut on CM Devendra Fadnavis:‘मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत आजही समाजात मोठा संभ्रम आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले पाहिजे. फक्त जाता येता माध्यमांशी बोलताना ते एखाद-दुसरी प्रतिक्रिया देणे योग्य नाही. मराठा, ओबीस किंवा इतर जांतींच्या मनात आरक्षणाबाबत ज्या शंका असतील, त्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली पाहिजे. सरकारच्या वतीने रोखठोक आणि पुराव्यांसह त्यांनी उत्तरे दिली पाहिजेत.” अशी प्रतिक्रीया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यातील सर्व प्रश्न, पक्ष-सरकार आणि कॅबिनेटमधीलही प्रश्न सोडवण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. एक दिवस याविषयावरून कॅबिनेटमध्ये गँगवॉर होईल, मंत्रिमंडळात एक दिवस गँगवॉर होईल. मी वारंवार हे सांगत आहे. हे बोलल्यानंतर मला माओवादी ठरविण्याचा प्रयत्न झाला.

Mumbai Local : मुंबईकरांनो लोकलने प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचा! तब्बल 14.5 तास लोकल बंद राहणार, काय आहे कारण?

राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या काही प्रमुख मागण्या मान्य करत नवा जीरआर काढण्यास मान्यता दिली. त्यानुसार मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. पण त्यानंतरही मंत्री छगन भुजबळांनी राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करत जीआर रद्द करण्याचा इशारा दिला आहे. त्यातच मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी सरकारधील नेते एकमेकांवर उघडपणे टीका करताना दिसत आहेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, ” तुमच्याकडे पत्रकार परिषदेसाठी जागा नसेल तर आम्ही शिवसेना भवनात, पत्रकार परिषदेसाठी जागा देऊ, पण यावर पत्रकार परिषद घ्या. पत्रकारांच्या चहापाण्याची व्यवस्थाही आम्हीच करू. पण जनतेच्या मनात मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात जो गोंधळ झाला आहे. त्यावर बसा चर्चा करा. वाटल्यास त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांनाही एकत्र बसवा, तरच समाजात शांतता नांदेल, तसेच, आज प्रत्येक समाज अस्वस्थ आहे. गोंधळात आहे, त्याला काय चाललयं हे कळत नाहीये, पण फडणवीस यांच्यासारखा सक्षम मुख्यमंत्री असताना त्यांनी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे पत्रकार परिषदेला घाबरू नये. त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी. असा सल्लाही त्यांनी यावेली दिला आहे.

नेपाळच्या जनतेला दिलासा! काठमांडूतील संचारबंदी उठवली, भारतीय राजदूतांनी नव्या पंतप्रधानांची घेतली भेट

मोदींच्या ईशान्य भारत दौऱ्यावर संजय राऊतांचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ सप्टेंबरपासून मिझोराम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. “मोदींच्या दौऱ्याकडे कुणाचे लक्ष नाही. मणिपूरमध्येच त्यांच्या दौऱ्याला विरोध होत आहे. काही गोष्टींवरील अराजकतेकडून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी असे उपक्रम राबवले जातात. भारत–पाक सामन्यावरचे लक्ष हटवण्याचाही हा प्रयत्न आहे,” असा आरोप राऊत यांनी केला. “जेव्हा मणिपूरमध्ये नग्न धिंड काढली जात होती, तेव्हा मोदी कुठे होते? तेव्हा त्यांनी तोंड उघडले नाही. आता दौऱ्याचा दिखावा कशाला? हे सर्व ढोंग आहे.” अशी टिकाही त्यांनी यावेळी केली

Web Title: When women were being stripped naked rauts direct question on modis manipur visit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 12:33 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • narendra modi
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Kalyan : मोदींच्या मातोश्रींचा अपमान काँग्रेसला महागात पडेल, भाजप महिला कार्यकर्त्यांचा इशारा
1

Kalyan : मोदींच्या मातोश्रींचा अपमान काँग्रेसला महागात पडेल, भाजप महिला कार्यकर्त्यांचा इशारा

Shinde-Fadnavis Controversy : शिंदे-फडणवीसांमध्ये पुन्हा नव्या वादाची ठिणगी; नेमकं काय आहे कारण?
2

Shinde-Fadnavis Controversy : शिंदे-फडणवीसांमध्ये पुन्हा नव्या वादाची ठिणगी; नेमकं काय आहे कारण?

Shivsena : “…संजय राऊत यांच्यावर कारवाई करा”, शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी
3

Shivsena : “…संजय राऊत यांच्यावर कारवाई करा”, शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी

Sanjay Raut Live : “नाशिकमध्ये गुन्हेगारीने टोक गाठलेलं…लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये; खासदार राऊतांचा इशारा
4

Sanjay Raut Live : “नाशिकमध्ये गुन्हेगारीने टोक गाठलेलं…लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये; खासदार राऊतांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.