Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राम मंदिरासाठी चांदीची वीट दिली याचा पुरावा काय?’; नितेश राणेंचा ठाकरे गटाला सवाल

राम मंदिरातील देणग्यांबाबतच्या आरोपांवरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. संजय राऊतांच्या दाव्यानंतर मंत्री नितेश राणेंनी पुराव्याची मागणी केली असून, SIT तपासातही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 26, 2026 | 09:36 PM
Nitesh Rane

Nitesh Rane

Follow Us
Follow Us:
  • राम मंदिरासाठी दिलेल्या चांदीच्या विटांवरून ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने
  • नितेश राणेंनी संजय राऊतांच्या दाव्यावर केली पुराव्याची मागणी
  • SIT तपासात चांदीच्या विटा नियमानुसार वितळवण्यात आल्याची माहिती
 

अयोध्येतील राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या चर्चेने राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. मंदिरासाठी भक्तांनी दिलेल्या चांदीच्या विटा आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या संदर्भात विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असतानाच आता महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर थेट निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर राणेंनी “राम मंदिरासाठी चांदीची वीट दिली होती, याचा नेमका पुरावा काय?” असा सवाल उपस्थित करत नव्या राजकीय वादाला तोंड फोडले आहे.

संजय राऊतांचे गंभीर आरोप

काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी राम मंदिरासाठी दिलेल्या देणग्यांबाबत गंभीर आरोप केले होते. त्यांनी मंदिरासाठी एक किलो वजनाची चांदीची वीट दिल्याचा दावा करत, त्या देणगीची अधिकृत पावती अद्याप मिळालेली नसल्याचे सांगितले. तसेच दानपेटीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा आकडा आणखी वाढू शकतो, असेही त्यांनी म्हटले होते.

नितेश राणेंचे प्रत्युत्तर

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी ठाकरे गटावर जोरदार पलटवार केला. “ते देणाऱ्यांपेक्षा घेणाऱ्यांपैकी आहेत. त्यांनी दिलेली चांदीची वीट प्रत्यक्षात दिली होती की केवळ फोटोपुरती होती, याचीही चौकशी व्हायला हवी,” असे वक्तव्य करत त्यांनी राऊतांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या या विधानानंतर आता ठाकरे गटाकडून काय उत्तर दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राजकारणात मोठी खळबळ! उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच विमानातून नागपूरला; योगायोग की नवे राजकीय संकेत?

SIT कडून संपूर्ण प्रकरणाची चौकशी

दरम्यान, राम मंदिरातील २०० किलो चांदीच्या विटांबाबतही अनेक दावे-प्रतिदावे समोर आले होते. काही देणगीदारांनी त्यांना देणगीची पावती मिळाली नसल्याचा आरोप केला होता. विशेष तपास पथक (SIT) या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून तपासादरम्यान काही महत्त्वाची माहिती समोर आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

माहितीनुसार, उद्योगपती राजू मंडवानी यांनी २०२१ मध्ये २०-२० किलो वजनाच्या दहा चांदीच्या विटा म्हणजेच एकूण २०० किलो चांदी राम मंदिरासाठी दान केल्याचा दावा केला होता. या देणगीची पावती न मिळाल्यामुळे सोशल मीडियावर चांदीच्या विटा गायब झाल्याच्या अफवा वेगाने पसरल्या. मात्र तपासात या दाव्यांमध्ये तथ्य आढळले नसल्याची माहिती समोर आली आहे.

‘फोडाफोडीची नशा चढली, उद्या फडणवीसांनाही फोडतील’; ‘ऑपरेशन टायगर’वर संजय राऊतांचा पलटवार

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, संबंधित चांदीच्या विटा नियमानुसार वितळवण्यासाठी सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे पाठवण्यात आल्या होत्या. त्याची अधिकृत नोंदही उपलब्ध असून संबंधित प्रक्रियेवर ट्रस्ट आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चांदीच्या विटा चोरीला गेल्याचा दावा तपासात सिद्ध झालेला नसल्याचे समोर आले आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे राम मंदिरातील देणग्यांच्या व्यवस्थापनावर आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. एका बाजूला विरोधक पारदर्शकतेची मागणी करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी नेते आरोपांना राजकीय रंग दिला जात असल्याचा दावा करत आहेत. पुढील काळात या प्रकरणातील अधिकृत तपास अहवाल आणि संबंधित पक्षांची भूमिका समोर आल्यानंतरच या वादाचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

Web Title: Nitesh rane questioned thackeray faction over ram mandir silver brick donation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 09:36 PM

Topics:  

  • Ayodhya ram mandir
  • Nitesh Rane
  • sanjay raut
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe on Sanjay Raut : ‘पुरावे द्या,’ संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर
1

Tukaram Mundhe on Sanjay Raut : ‘पुरावे द्या,’ संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
2

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार
3

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार

Maharashtra Drought : जालन्यात दुष्काळाचा मच्छीमारांना मोठा फटका; सोमठाणा तलावात मत्स्यउत्पादन २० टक्क्यांवर
4

Maharashtra Drought : जालन्यात दुष्काळाचा मच्छीमारांना मोठा फटका; सोमठाणा तलावात मत्स्यउत्पादन २० टक्क्यांवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.