Ajit Dada is now a senior citizen; Supriya Sule's counter attack on Ajit Pawar, read detailed report
NCP Crisis : लोकसभेच्या आगामी निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुकांची तयारी पक्षांनी सुरू केली आहे. अशातच शिरूर, सातारा, रायगड आणि बारामतीची जागा आपण लढवणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर सध्या बारामती, शिरूर आणि सातारा या जागा सध्या शरद पवार यांच्याकडे आहेत. तर रायगडमध्ये अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे हे खासदार आहेत.
शरद पवार गटाचे खासदार
तर इतर तीन जागी शरद पवार गटाचे खासदार आहेत. शिरूरमध्ये अमोल कोल्हे, सातारामध्ये श्रीनिवास पाटील तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे सध्या खासदार आहेत. या जागी आता अजित पवार देखील आपले उमेदवार उभे करणार आहेत, त्यामुळे या चार मतदारसंघात पवार विरूध्द पवार अशी लढत दिसून येण्याची शक्यता आहे.
३ जागांवर अजित पवार गटाचे उमेदवार
रायगडसह आता इतर ३ जागांवर अजित पवार गटाचे उमेदवार कोण असतील हे पाहणंही महत्त्वाचं आहे. तर ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या जागा आहेत त्या आपण लढवूच पण, त्याचबरोबर ठाकरे गटाकडे ज्या जागा आहेत, त्यापैकी ज्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असेल तर तिथं भाजप आणि शिंदेंशी चर्चा करून आपल्याला जागा वाटप करता येईल” असं अजित पवार म्हणाले
अजित पवार कोणते उमेदवार देणार पाहणं महत्त्वाचं
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा बारामती मतदारसंघ येथे सुप्रिया सुळे निवडणूक लढवतात. मात्र, आता अजित पवार या ठिकाणी कोणता उमेदवार देणार याकडे राज्याचं लक्ष आहे. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार घरातील कोणत्या व्यक्तीला उमेदवारी देणार का? मुलगा पार्थ पवार की, पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणार का? किंवा कुटुंबातील कटूता टाळण्यासाठी अजित पवार बाहेरील उमेदवार म्हणून अजित पवार रूपाली चाकणकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे, पवार कुटुंब वारंवारं राजकारण आणि नातेसंबध वेगळे असल्याचे सांगत असले तरी आगामी लोकसभेत कोण उमेदवार असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तर दुसरी जागा आहे साताऱ्याची, सातारा लोकसभा मतदारसंघ देखील गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादीकडे आहे. याठिकाणी शरद पवारांचे जवळचे मित्र श्रीनिवास पाटील खासदार आहेत. त्याच्याविरोधात अजित पवार गट नितीन लक्ष्मणराव पाटील यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. वाई खंडाळ्याचे आमदार मकरंद पाटील त्यांचे नितीन पाटील हे बंधू आहेत.
शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील शिरूरमधून
शिरूर मतदारसंघात अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार गटाकडे देण्यासाठी कोणताही प्रबळ उमेदवार नसल्यामुळे या जागी शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. कारण त्याठिकाणी दुसरा कोणताही प्रबळ दावेदार नसल्याने ही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रायगडमध्ये अजित पवार गटाचे खासदार आहेत. त्याठिकाणी सुनील तटकरे किंवा त्यांच्या परिवारातील कोणती व्यक्ती उमेदवार असू शकते. तर त्याठिकाणची जागा शरद पवार ठाकरे गटाला देऊ शकते. कारण त्याठिकाणी ठाकरे गटाकडे अनंत गीते हे प्रबळ दावेदार आहेत. तर ठाकरे गटाच्या कोणत्या जागांवर अजित पवार गट निवडणूक लढवणार ते पाहंणही औत्सुक्याचं असणार आहे.