Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सह्याद्रीच्या रांगांमध्ये पर्यावरणाला घातक प्रकल्प सहन करणार नाही; सयाजी शिंदेंचा थेट इशारा

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते विकासाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधला जात असून वृक्षसंवर्धनाबाबत आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात येत असल्याचे सातपुते यांनी सांगितले.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 06, 2026 | 05:03 PM
Sayaji Shinde Satara heritage trees protest 2026

Sayaji Shinde Satara heritage trees protest 2026

Follow Us
Follow Us:

Sayaji Shinde News: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षदिंडीमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देताना अभिनेते सयाजी शिंदे यांनी शासनाच्या वृक्षतोड धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शेकडो वर्षांचा इतिहास जपणाऱ्या हेरिटेज वृक्षांची होत असलेली कत्तल ही अत्यंत वेदनादायी बाब असल्याचे सांगत त्यांनी शासनाला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पर्यावरणाला घातक ठरणारे कोणतेही प्रकल्प सहन केले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.

साताऱ्यातील ४६ हेरिटेज वृक्ष वाचविण्यासाठी नागरिकांनी उभारलेल्या संघर्षाचे कौतुक करताना सयाजी शिंदे म्हणाले, “साताऱ्याला झाडे वाचवण्याचा नाद लागला आहे आणि हा नाद चांगलाच आहे. झाडे वाचवण्यासाठी लोक रस्त्यावर उतरतात, ही पर्यावरणासाठी आशादायी बाब आहे.”

Baramati Rain : बारामती परिसरात वादळी पावसाने मोठे नुकसान; शहरासह तालुक्यातील

ते पुढे म्हणाले की, विकासाच्या नावाखाली दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीची वड, पिंपळ, उंबर यांसारखी विशाल आणि ऐतिहासिक झाडे तोडली जात आहेत. ही केवळ झाडे नसून आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि पर्यावरणाचा अमूल्य वारसा आहे. अशा झाडांची कत्तल होत असताना संबंधित यंत्रणा आणि शासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

“एक झाड तोडले की पाच झाडे लावली जातील, असे सांगितले जाते. मात्र ती झाडे कुठे लावली, किती जगली आणि त्यांचे पुढे काय झाले याचा हिशोब कोणी देत नाही. केवळ आकडेवारी मांडून पर्यावरणाचे रक्षण होत नाही. प्रत्यक्षात झाडे जगली पाहिजेत,” अशा शब्दांत त्यांनी शासनावर टीका केली.

सयाजी शिंदे यांनी स्वतःच्या पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांची माहिती देताना सांगितले की, त्यांनी ‘वृक्षांचे अनाथाश्रम’ ही संकल्पना सुरू केली आहे. विविध ठिकाणी तोडली जाण्याच्या मार्गावर असलेली किंवा दुर्लक्षित झालेली झाडे आणून त्यांचे पुनर्जीवन करण्याचे काम सुरू आहे. उजाड माळरानांवर ही झाडे पुन्हा रुजवली जात असून त्यांना नवजीवन दिले जात आहे.

“शासनाला जर हे काम करता येत नसेल तर आम्हाला फोन करा. आम्ही सर्वजण मदतीला तयार आहोत. झाडे वाचवण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणप्रेमी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. आम्ही पुढील काळात ४० ते ५० हजार वृक्षांचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प केला आहे,” असेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी वनविभागाची भूमिका स्पष्ट केली. विकासासाठी रस्ते आवश्यक असले तरी पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. वड, पिंपळ, उंबर यांसारख्या मोठ्या वृक्षांचे पुनर्लागवड आणि पुनर्जीवन करण्यासाठी वनविभाग विशेष यंत्रणा कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

ST Employees: आर्थिक संकटात लालपरी! ७ हजार कोटींच्या थकबाकीतून बाहेर काढण्यासाठी

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते विकासाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधला जात असून वृक्षसंवर्धनाबाबत आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात येत असल्याचे सातपुते यांनी सांगितले. रस्ता रुंदीकरणाच्या कामांमध्ये परवानगीपेक्षा अधिक झाडे तोडली जात नाहीत ना, यासाठी विशेष पथक कार्यरत आहे. तसेच ज्या ठिकाणी हेरिटेज वृक्ष आहेत, त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचे संरक्षण करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोंढवे परिसरात सुमारे ५० वटवृक्षांचे पुनर्जीवन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वनविभागाने हाती घेतला असल्याची माहितीही त्यांनी दिली. आगामी काळात रस्ता रुंदीकरण किंवा विकासकामांमुळे वृक्षतोडीचा प्रश्न निर्माण झाल्यास वनविभागाचे विशेष पथक तत्काळ हस्तक्षेप करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वृक्षदिंडीमध्ये पर्यावरणप्रेमी, वृक्षसंवर्धन चळवळीतील कार्यकर्ते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ॲड. वर्षा देशपांडे तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. साताऱ्यातील हेरिटेज वृक्षांचे संरक्षण, वृक्ष पुनर्जीवन आणि पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

सयाजी शिंदे यांच्या स्पष्ट आणि परखड भूमिकेमुळे पर्यावरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून विकास आणि पर्यावरण यामधील समतोल राखण्याची जबाबदारी शासनाने अधिक संवेदनशीलतेने पार पाडावी, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.

 

 

Web Title: Will not tolerate environmentally hazardous projects in sahyadri ranges sayaji shinde warns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • Satara
  • Sayaji Shinde
  • World Environment Day

संबंधित बातम्या

शेखर चरेगांवकर यांचा जामीन फेटाळला, सरकारी वकिलांच्या परखड युक्तिवादानंतर न्यायालयाचा निर्णय
1

शेखर चरेगांवकर यांचा जामीन फेटाळला, सरकारी वकिलांच्या परखड युक्तिवादानंतर न्यायालयाचा निर्णय

Shivrajyabhishek Din 2026: कराडच्या संदीप डाकवे यांची अनोखी शिवभक्ती; ‘वारली’ चित्रकलेतून साकारला ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा
2

Shivrajyabhishek Din 2026: कराडच्या संदीप डाकवे यांची अनोखी शिवभक्ती; ‘वारली’ चित्रकलेतून साकारला ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिम, आरे परिसरात जंगल निर्माण करणार, मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही
3

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिम, आरे परिसरात जंगल निर्माण करणार, मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही

कार्टनपासून सजीव प्रतिकृतींपर्यंत; जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत पुनर्वापराचा अनोखा संदेश
4

कार्टनपासून सजीव प्रतिकृतींपर्यंत; जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत पुनर्वापराचा अनोखा संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.