Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर! महाविकास आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी

स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटी आणि अनियमिततेविरोधात महाविकास आघाडीने साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची आणि ब्लॅकलिस्टेड कंपन्यांवर बंदीची मागणी करण्यात आली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 20, 2026 | 04:41 PM
साताऱ्यात महाविकास आघाडीचा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा!

साताऱ्यात महाविकास आघाडीचा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा!

Follow Us
Follow Us:
  • साताऱ्यात महाविकास आघाडीचा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा!
  • पेपर फुटीविरोधात आक्रमक पवित्रा
  • शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
सातारा, दि. 20 (प्रतिनिधी): स्पर्धा परीक्षा, नोकरभरती आणि ऑनलाइन परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने सोमवारी साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करून शासनाचे लक्ष विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे वेधले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र व राज्य सरकारकडे सादर करण्यात आले.

निवेदनात स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार समोर येणाऱ्या कथित पेपरफुटीच्या घटनांची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. परीक्षा प्रक्रियेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका महाविकास आघाडीने मांडली.

तसेच ब्लॅकलिस्ट करण्यात आलेल्या कंपन्यांना परीक्षा प्रक्रियेची कंत्राटे देऊ नयेत, राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) कामकाजातील त्रुटींची जबाबदारी निश्चित करावी, ऑनलाइन परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित, पारदर्शक व विश्वासार्ह करण्यासाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा तातडीने राबवाव्यात, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या.

Satara News : पैशाच्या व्यवहारातून पेरले येथे गोळीबार; दोन्ही पायांना गोळ्या लागल्याने एकजण गंभीर

विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

याशिवाय, विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित वागणुकीचा निषेध व्यक्त करण्यात आला. विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. या आंदोलनात महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थी प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Satara : सामाजिक कार्यकर्त्यांचे आत्मक्लेश आंदोलन, सोनम वांगचूक यांना पाठिंबा देत पोलिसांच्या कारवाईबद्दल व्यक्त केली नाराजी

Web Title: The future of students hangs in the balance maha vikas aghadi submits a memorandum to the district collector demanding transparency in the examination process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • CJP
  • MVA
  • Protest
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!
1

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात
2

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी
3

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी

आगीच्या ज्वाळांनी दिला इशारा; वाई एमआयडीसीला स्वतंत्र फायर स्टेशन कधी?
4

आगीच्या ज्वाळांनी दिला इशारा; वाई एमआयडीसीला स्वतंत्र फायर स्टेशन कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.