Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुणबी प्रमाणपत्रासाठी चुकीचे निकष खपवून घेणार नाही : मनोज जरांगे-पाटील

आरक्षण हा आपला अधिकार आहे. कोणी जाणुनबुजून अडचणी निर्माण करत असेल तर ते खपवून घेणार नाही. अशा शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तक्रारी करा. त्यांच्यावर कारवाई करण्यास सरकारला आपण भाग पाडू.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 16, 2026 | 01:39 PM
कुणबी प्रमाणपत्रासाठी चुकीचे निकष खपवून घेणार नाही : मनोज जरांगे-पाटील

कुणबी प्रमाणपत्रासाठी चुकीचे निकष खपवून घेणार नाही : मनोज जरांगे-पाटील

Follow Us
Follow Us:

पाटण : मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी कोल्हापूरहून बारामतीला जात असताना कराड येथे पाटण तालुका मराठा क्रांती मोर्चा सेवकांची भेट घेतली. यावेळी त्यांचे पाटण मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले. पाटण तालुक्यातील सर्वात जास्त कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मात्र, प्रमाणपत्र देण्यासाठी चुकीचे निकष लावून जाणुनबुजून अडथळे निर्माण केले जात आहेत, ते खपवून घेणार नाही. याबाबतीत माझ्याकडे अनेकदा तक्रारी आल्या आहेत. यासाठी मी लवकरच पाटणला भेट देणार आहे, असे आश्वासन मनोज जरांगे पाटील यांनी पाटणवासियांना दिले.

यावेळी मराठा क्रांती मोर्चा पाटण तालुक्याचे सेवक राजेंद्र निकम, प्रशांत पाटील, शंकरराव मोरे, चंद्रकांत शिर्के, धैर्यशील पाटणकर, जयवंतराव सुर्वे, मनोहर यादव, राहुल शेडगे, विक्रम यादव, प्रदीप घाडगे, अनिल भोसले, नितीन पिसाळ, शंकर मोहिते, लक्ष्मण चव्हाण, शैलेश जगताप, राजेंद्र मोरे, कुमार साळुंखे, सदाशिव पवार, बाबा पवार, प्रविण उदुगडे, संजय कांबळे, कोंडीबा संकपाळ आदी मराठा सेवक उपस्थित होते‌.

मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता कोल्हापूर दौरा आटोपून फलटण बारामतीला जाताना कराड येथे मराठा सेवकांना भेटले. कोल्हापूर नाका, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दत्त चौक, सैदापुर असे ठिकठिकाणी मराठा सेवकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मराठा सेवकांनी स्थानिक पातळीवर कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा पाढा त्यांच्यासमोर वाचला.

यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, आरक्षण हा आपला अधिकार आहे. कोणी जाणुनबुजून अडचणी निर्माण करत असेल तर ते खपवून घेणार नाही. अशा शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तक्रारी करा. त्यांच्यावर कारवाई करण्यास सरकारला आपण भाग पाडू. यानंतर कराड तालुक्यातील शहापूर येथील शहीद जवान अर्जुन राजेंद्र जाधव यांच्या घरी जाऊन जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केले. यानंतर ते सातारा-फलटण-बारामतीकडे रवाना झाले.

स्व. यशवंतराव जगताप यांना श्रद्धांजली

पाटणचे मराठा क्रांतीचे सेवक स्व. यशवंतराव जगताप (बाबा) यांचे यावेळी स्मरण करण्यात आले. मराठ्यांचा सच्चा मावळा हरपल्याची भावना मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. स्व. यशवंतराव जगताप (बाबा) यांची मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना भेटण्याची तीव्र इच्छा होती. मात्र त्यांच्या आकस्मिक निधनाने ती अपूर्ण राहिली असल्याची भावना चिरंजीव शैलेश जगताप यांनी व्यक्त केली यावेळी पाटणचे मराठा सेवक उपस्थित होते‌.

प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी करणार आंदोलन; 29 जूनपासून राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा इशारा

Web Title: Will not tolerate incorrect criteria for kunbi certificates says manoj jarange patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Maratha Reservation
  • Reservation Bill

संबंधित बातम्या

प्रमाणपत्रांच्या त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करणार; मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक
1

प्रमाणपत्रांच्या त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करणार; मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक

‘58 लाख नोंदी सापडल्या तर कुणबी प्रमाणपत्र का देत नाही?’; मंत्र्यांसमोर मनोज जरांगेंचा संताप
2

‘58 लाख नोंदी सापडल्या तर कुणबी प्रमाणपत्र का देत नाही?’; मंत्र्यांसमोर मनोज जरांगेंचा संताप

जरांगे पाटलांच्या आंदोलनापूर्वी छगन भुजबळांची समता परिषदेची बैठक; ओबीसी आरक्षणावर म्हणाले, ‘कोण म्हणतं आरक्षण संपलं?’
3

जरांगे पाटलांच्या आंदोलनापूर्वी छगन भुजबळांची समता परिषदेची बैठक; ओबीसी आरक्षणावर म्हणाले, ‘कोण म्हणतं आरक्षण संपलं?’

‘… तर मराठेही डाव टाकणार’, मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक, 29 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा
4

‘… तर मराठेही डाव टाकणार’, मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक, 29 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.