Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Fraud News: ऑनलाईन फ्रॉडबाबत महिलांनी रहावे सावध; सीईओंनी दिला खास सल्ला

उमेद अभियानातील कार्यरत महिला बचत गटांच्या समुदाय संसाधन व्यक्ती यांच्याशी ऑनलाईन संवाद साधून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 11, 2025 | 05:07 PM
Women should be careful about online fraud; CEO gives special advice Jalgaon News

Women should be careful about online fraud; CEO gives special advice Jalgaon News

Follow Us
Close
Follow Us:

Crime News: जळगाव : उमेद अंतर्गत सतर्कता पंधरवाडा राबवण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे. या अंतर्गत जनजागृतीसाठी मीनल करणवाल यांनी उपक्रम हाती घेतला आहे. त्याची सुरुवात जामनेर तालुक्यातील उमेद अभियानातील कार्यरत महिला बचत गटांच्या समुदाय संसाधन व्यक्ती यांच्याशी ऑनलाईन संवाद साधून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

उमेद अभियानाचे जिल्ह्यातील २ हजार २५० कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती अर्थात सीआरपी कार्यरत आहेत. जिल्ह्यात एकूण ६७ प्रभाग संघ असून १४३० ग्राम संघातील एकूण ३३,००० स्वयंसहायता समूह सक्रिय आहेत. एका स्वयंसहाय्यता समूहामध्ये १० महिला असे एकूण तीन लाख तीस हजार महिला जिल्ह्यात स्वयंसहायता समूहांमध्ये समाविष्ट आहेत. महिलांमध्ये ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार घडत असतात. त्यासंबंधी जाणीव जागृती होण्यासाठी जिल्हा परिषद जळगाव आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव यांच्या मार्गदर्शनाने महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.

महिलांनी सावध राहावे : सीईओंनी दिला सल्ला

महिलांना मार्गदर्शन करताना कोणत्याही अमिषाला बळी न पडता आपले बॅंकिंग व्यवहार सांभाळून करावेत याबाबत मीनल करणवाल यांनी मार्गदर्शन केले. सदरील ऑनलाइन कार्यशाळेसाठी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा राजू लोखंडे, लीड डिस्ट्रिक्ट बॅंक मॅनेजर सुनील कुमार दोहरे जिल्हा अभियान व्यवस्थापक हरेश्वर भोई व तालुका अभियान व्यवस्थापक सर्व टीम ऑनलाईन हजर होते.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन फ्रॉड आणि फसवणूक होऊ नये यासाठी सतर्कता पंधरवडा राबविण्यात येत आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्ह्यातील कार्यरत महिला केडर सर्व समुदाय संसाधन व्यक्ती यांचे ऑनलाइन कार्यशाळा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यातील सर्व केडर यांची कार्यशाळा घेण्यात आली. सदरील कार्यशाळेमध्ये महिलांनी ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित रहावे व सतर्क रहावे तसेच कुठल्याही अनोळखी व्यक्ती यांनी पाठवलेले मेसेज लिंक याला प्रतिसाद देऊ नये.

मोबाईल वापरताना काळजीपूर्वक वापरावा आपल्या मोबाईल मध्ये आलेले पासवर्ड कोणालाही शेअर करू नये तसेच आर्थिक व्यवहार करताना सांभाळून करावेत. कुठल्याही एसएमएस ऑनलाइन लिंक याबाबत तात्काळ प्रतिसाद देऊ नये त्याची शहानिशा करून समजदार व जाणकार व्यक्तीकडून त्याबाबत खात्री झाल्यावरच त्याबाबत प्रतिसाद द्यावा.

क्राईम न्यूज वाचण्यासाठी क्लिक करा 

अवैध वाळू चोरीची ८ वाहने जप्त; गिरणा नदीपात्राच्या गस्तीत वाढ

जळगाव जिल्ह्यात गिरणा नदीपात्रातून सुरू असलेल्या वाळू चोरीविरोधात तहसीलदार शीतल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन दिवसांपासून मोहीम हाती घेण्यात आली आहे. महसूलच्या गस्ती पथकाने तीन डंपर, पाच ट्रॅक्टर अशी आठ वाहने जप्त केली. जळगाव मंडळ अधिकारी, भोकर, असोदा, पिंप्राळा, मेहरूण, शिरसोली येथील ग्राम महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गिरणा नदीपात्रात गस्त वाढवली आहे. या गस्तीदरम्यान पथकाने ही कारवाई केली. तहसीलदार शीतल राजपूत यांनी स्वतः सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मेहरूण तलावाजवळ पथकासह छापा टाकला. या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले आणि प्रशासकीय इमारतीच्या आवारात जमा करण्यात आले. दरम्यान, दोन दिवसांत आठ वाहने (५ ट्रॅक्टर आणि ३ डंपर) जप्त केली आहेत. त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे.

Web Title: Women should be careful about online fraud ceo gives special advice jalgaon news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 05:07 PM

Topics:  

  • crime news
  • daily news
  • jalgoan

संबंधित बातम्या

Maharashtra Local Body Elections 2025: संतोष टारफे भाजपाच्या वाटेवर? आदिवासी विकास मंत्र्यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण !
1

Maharashtra Local Body Elections 2025: संतोष टारफे भाजपाच्या वाटेवर? आदिवासी विकास मंत्र्यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण !

बार्शी हादरली! 14 महिन्याच्या लेकराला विष पाजून आईने घेतला गळफास
2

बार्शी हादरली! 14 महिन्याच्या लेकराला विष पाजून आईने घेतला गळफास

Crime News: वारसा नोंद करण्यासाठी लाच मागितली अन् तलाठी फसला; ACB ने थेट…
3

Crime News: वारसा नोंद करण्यासाठी लाच मागितली अन् तलाठी फसला; ACB ने थेट…

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; ‘या’ भागातील घरे फोडून लाखोंचा ऐवज चोरला
4

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; ‘या’ भागातील घरे फोडून लाखोंचा ऐवज चोरला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.