Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शारदानगर येथे उद्यापासून जागतिक कृषी प्रदर्शन ; १८ ते २२ जानेवारी दरम्यान आयोजन

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाद्वारे शेती प्रयोगाचे विशेष आकर्षण

  • By Aparna
Updated On: Jan 16, 2024 | 09:06 PM
शारदानगर येथे उद्यापासून जागतिक कृषी प्रदर्शन ; १८ ते २२ जानेवारी दरम्यान आयोजन
Follow Us
Close
Follow Us:

बारामती: येथील बारामती कृषी विज्ञान केंद्रात दिनांक १८ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान कृषक २०२४ या जागतिक स्तरावरील कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी दिली.

ऑक्सफर्ड विद्यापीठ लंडन, मायक्रोसॉफ्ट कंपनी व बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, महाराष्ट्र शासन कृषी विभाग नाबार्ड काही खाजगी कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने हे जागतिक स्तरावरील शेती विषयक प्रात्यक्षिक के आधारित कृषी प्रदर्शन १७० एकर क्षेत्रावर आयोजित करण्यात आले आहे .या कृषी प्रदर्शनात प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऊस उत्पादन वाढीचे तंत्र, मातीविना शेती प्रयोग, २०हून अधिक देशाचे प्रगत कृषी तंत्रज्ञान पाहता येणार आहे . यामध्ये नेदरलँड, चीन, अमेरिका, इस्त्राईल, ब्राझील ,स्पेन ,इटली, जर्मनी, आफ्रिका, फ्रान्स, थायलंड, कोरिया, जपान, इंग्लंड, मेक्सिको, स्वीडन, तुर्कस्तान, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशातील विविध आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), सेन्सर व रोबोटिक तंत्रज्ञान बियाणे खते औषधे मशिनरी पॉलिहाऊस लागवड तंत्रज्ञान स्मार्ट टूल्स पाण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे या देशातील तंत्रज्ञानामध्ये जपान येथील बायो ब्लॉक नियंत्रणा नेदरलँड स्पेन जर्मनी थायलंड इत्यादी देशातील विषमुक्त शेती उत्पादनासाठी आधुनिक औषधे सेंसर तंत्रज्ञानावर आधारित नेदरलँड इंग्लंड अमेरिका देशातील प्रगत मशिनरी इस्त्राईल येथील सूक्ष्म सिंचन प्रणाली इटली येथील सेन्सर चलित मशिनरी तंत्रज्ञान असणार आहे.

ठिबक सिंचनाचे युग येऊन अनेक वर्षे उलटली, तरी पाटाने पाणी देण्याची पध्दत बदलली नाही, त्यामुळे पिकाला नेमके किती पाणी, कशी खतमात्रा, कोणते औषध कधी हवंय याचा नेमका अंदाज घेण्यात आजही आपण अयशस्वी ठरतो. खत व्यवस्थापनातील अचूकतेचा अभाव, हवामानातील अचानक होणारे बदल, बाजारातील तीव्र चढउताार या साऱ्या पार्श्वभूमीवर शेतीपुढील समस्या वाढताना दिसतात. अनेकदा शेतकरी बांधवांकडून पिकांच्या व्यवस्थापनातील बदलांची चर्चा आपण ऐकतो. मात्र त्यावर उपाय नेमका कोणता व तो निश्चित स्वरूपाचा आहे का असे प्रश्न विचारले जातात. या प्रदर्शनात यंदाच्या वर्षी आर्टिफिशीयल इंटेलिजन्स ही संकल्पना आहे. म्हणजेच शेतीतील बहुतेक सर्व नगदी व भाजीपाल्याची पिके हे कृत्रिम बुध्दीमत्तेचे तंत्र वापरून अधिक दर्जेदार, गुणवत्ताक्षम, कमी कालावधीत अधिक वाढ होणारी, उत्पादन देणारी रुजवता येऊ शकतात ही ती मूळ संकल्पना आहे. त्यासाठी गेली दिड वर्षे या ठिकाणी काम सुरू असून प्रत्यक्षात उसापासून ते स्ट्रॉबेरीपर्यंत आणि हळदीपासून ते खरबूजापर्यंतची अनेक पिके कृत्रिम बुध्दीमत्तेद्वारे घेण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून येथे काम सुरू आहे. ते प्रत्यक्षात साकारण्यात येथील तज्ञ यशस्वी झाले आहेत.

काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स?

सध्या ग्लोबल वॉर्मिंग किंवा हवामानातील तीव्र बदलांमुळे ऋतुमानातही प्रचंड बदल होत आहेत. अशावेळी ऋतुमानानुसार होणाऱ्या पिकांमध्ये प्रचंड नुकसान शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतीचे हे अतोनात नुकसान कमी करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्र कमालीचे मदतीचे व मार्गदर्शक ठरणार आहे. शेतीमातीशी नाळ जोडत मातीतील सर्व घटकांची इत्थंभूत माहिती गोळा करून अगदी काही क्षणात ते शेतकऱ्यांपर्यंत पोचविणे, त्यामध्ये मातीतील सर्व घटक, जसे की, अन्नद्रव्यांचे प्रमाण, सामू, क्षारता, आर्द्रता, सेंद्रीय कर्ब, मातीची घनता, त्या मातीत उगविणाऱ्या वनस्पतीच्या पानातील प्रकाश संश्लेषणाचा वेग, सभोवतालच्या परिस्थितीत संभाव्य येऊ घातलेले रोग, किडीचे पूर्वानुमान, म्हणजेच मातीतील रासायनिक, भौतिक घटकांची रिअल टाईम मूल्यमापन, परिसरातील भौगोलिक बदल अगदी सहजपणे व वारंवार टिपून ते शेतकऱ्यांना थेट पोचविण्याचे काम शेतीतील कृत्रिम बुध्दीमत्तेचे तंत्र करते व शेती उत्पादनाशी संबंधित कोणताही संभाव्य धोका व त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्याचे काम हे तंत्र करते.

यामध्ये शेतीच्या चतु:सिमा उपग्रहाद्वारे रेखित केल्या जातात. रेडिएशनच्या द्वारे सेंटीनल-2 या उपग्रहाच्या मदतीने जमीनीतील उपलब्ध नत्र, पालाश, स्फूरद व इतर सर्वच घटकांची माहिती मायक्रोसॉप्टने विकसित केलेल्या आर्टिफिशीयल इंटेलिजन्सच्या प्रणालीला पाठवली जाते. ही झाली जमीनीच्या वरची माहिती, मग दुसरा घटक म्हणजे शेतात उभ्या पिकामध्ये जमीनीत असणारे उच्च दर्जाचे सेन्सर्स जमीनीतील व वरचे बदल टिपून तीही माहिती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रणालीला पाठवते आणि तेवढ्याच वेगाने परत शेतकऱ्याच्या मोबाईलपर्यंत पोचविण्याचे काम हे तंत्र करते. या तंत्राद्वारे पिकांमध्ये अचानक होणारे बदल, खतांची उपलब्ध व आवश्यक मात्रा, पाण्याचे प्रमाण, हायपर स्पेक्ट्रल कॅमेऱ्याच्या मदतीने रोगकिडीचा होत असलेला व संभाव्य प्रादुर्भाव या साऱ्या माहितीचे संकलन होऊन पिके अधिक कार्यक्षम व उत्पादनक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन होते. जमीनीच्या वरचा भाग आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो, मात्र जमीनीखालच्या भौतिक व रासायनिक बदलांची माहिती वारंवार व तातडीने देऊन त्या ठिकाणी होत असलेल्या भविष्यात पिकांच्या येऊ घातलेल्या अडचणींवर वेळीच उपाय शोधता येतो.

उसाच्या पिकात आर्टिफिशीयल इंटेलिजन्स कसे काम करते?

बारामतीत मायक्रोसॉप्ट, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून अशा प्रकारची शेती यशस्वी करण्यात आली आहे. १८ ते २२ जानेवारीदरम्यान शेतकऱ्यांना याची देही याची डोळा अनुभवता येईल. महत्वाची गोष्ट म्हणजे हमखास पैसे मिळवून देणाऱ्या उसाच्या पिकातही आर्टिफिशियल तंत्र कसे काम करते, हे या प्रदर्शनात पाहता येणार आहे.

शेतीत वाढणारा खर्च, खतमात्रेचा आहे. मनुष्यबळाचा आहे. पाण्यावरचा आहे. त्यामुळेच आज कृत्रिम बुध्दीमत्तेची गरज उसाच्या पिकाला आहे. जमीनीत उपलब्ध असणारे अन्नद्रव्ये, जसे की, नत्र, स्फूरद, पालाश, गंधक, कॅल्शिअम, लोह, जस्त, तांबे, बोरॉन, मंगल मोलिब्डेनम अशांचे प्रमाण वस्तुस्थितीवर आधारीत सहजगत्या मिळत नाही. त्यांचे प्रमाण रासायनिक पृथ्थकरणाद्वारे तिथेच तपासून विश्लेषित अहवालासह अगदी काही क्षणात देण्याची क्षमता कृत्रिम बुध्दीमत्तेत आहे. मुळांसाठी उपलब्ध अन्नद्रव्य, त्यांची गरज, जमीनीतील अगदी एका फुटा-फुटाने बदलत जाणारे भौतिक, रासायनिक गुणधर्म यामुळे माती परिक्षणालाही मर्यादा येतात, मात्र हे सततचे बदल वारंवार टिपून योग्य त्या उपाययोजनांची शिफारस करण्याचे काम हे तंत्र करते.

आर्टिफिशियल तंत्रामुळे पिकासाठी होणाऱ्या खर्चात बचत होऊन पिकाची उत्पादकता मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे राजेंद्र पवार यांनी यावेळी सांगितले.प्रताप पवार, राजेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संचालक अजित जावकर, एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा प्रकल्प कार्यान्वित आहे. दरम्यान दरवर्षी आयोजित होत असलेल्या या कृषी प्रदर्शनात आत्तापर्यंत पंधरा लाख शेतकऱ्यांनी लाभ घेतला असल्याचे राजेंद्र पवार यांनी बोलताना सांगितले.

Web Title: World agricultural exhibition from tomorrow at shardanagar conducted from 18th to 22nd january nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2024 | 09:06 PM

Topics:  

  • baramati
  • baramati news
  • maharashtra
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Latur News: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी कारवाई; पुण्यातील खून प्रकरणातील 5 आरोपींना लातुरात अटकेत
1

Latur News: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी कारवाई; पुण्यातील खून प्रकरणातील 5 आरोपींना लातुरात अटकेत

Pune News : विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र जागतिक केंद्र बनावं; तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कार्यशाळेत आवाहन
2

Pune News : विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र जागतिक केंद्र बनावं; तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कार्यशाळेत आवाहन

निवडणूक आयोगाला आली जाग! महापालिकेतील गोंधळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जि. प. निवडणुकांसाठी १४ हजार EVM
3

निवडणूक आयोगाला आली जाग! महापालिकेतील गोंधळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जि. प. निवडणुकांसाठी १४ हजार EVM

कऱ्हा- नीरा उपसा सिंचन योजना लवकरच मार्गी लावणार, या प्रकल्पामुळे…; अजित पवार यांनी दिली माहिती
4

कऱ्हा- नीरा उपसा सिंचन योजना लवकरच मार्गी लावणार, या प्रकल्पामुळे…; अजित पवार यांनी दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.