Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोस्टल रोडवर साकारणार जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र! रिलायन्सकडून ५१ हेक्टरचा कायापालट; पर्यटन, मनोरंजन केंद्रे उभारली जाणार

महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबईकरांना आणि पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यालगत विस्तीर्ण खुल्या जागा, विरंगुळ्याची आधुनिक साधने आणि निसर्गरम्य हरित परिसर उपलब्ध होणार आहे. मुंबईचा हा कोस्टल रोड परिसर आगामी काळात शहरातील केवळ एक वाहतूक मार्ग न राहता, देशातील प्रमुख सार्वजनिक आणि पर्यटन आकर्षणाचे केंद्र ठरेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 21, 2026 | 09:00 AM
कोस्टल रोडवर साकारणार जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र!

कोस्टल रोडवर साकारणार जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र!

Follow Us
Follow Us:

मुंबई कोस्टल रोडच्या दक्षिणेकडील भागात आता आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटन आणि मनोरंजनाची केंद्रे उभारली जाणार आहेत. यात बीच बोर्डवॉक, खुली क्रीडा मैदाने, पक्षी उद्यान (अॅव्हियरी), पेटिंग झू, फेरिस व्हील, अॅम्फीथिएटर आणि विस्तीर्ण किनारी उद्यानांचा समावेश असलेला एक भव्य आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी मिळाल्यानंतर, या परिसराच्या विकासासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’कडून याच आठवड्यात पालिकेकडे अंतिम मास्टर प्लॅन सादर केला जाणार आहे. मुंबई पालिकेच्या पाच सदस्यीय लँडस्केप समितीने या मास्टर प्लॅनला मंजुरी दिल्यानंतर, पुढील २४ महिन्यांत हा संपूर्ण परिसर जागतिक दर्जाच्या खुल्या सार्वजनिक जागेच्या स्वरूपात विकसित करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाची उभारणी आणि देखभाल-दुरुस्ती रिलायन्स इंडस्टीजकडन प्रदील ३० वर्षे केली जाईल.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Mumbai BEST Bus Strike: बेस्ट कर्मचाऱ्यांची 100 टक्के बंदची हाक, २७६६ पैकी केवळ ३२ बस रस्त्यावर, मुंबईकरांचे हाल

कोस्टल रोड, त्यालगतचा प्रॉमेनेड नागरिकांसाठी खुला

तसेच त्यानंतर आणखी ३० वर्षे मुदतवाढ घेण्याचा पर्यायही करारात उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुंबईच्या दक्षिणेकडील कोस्टल रोड आणि त्यालगतचा विस्तीर्ण प्रॉमेनेड सध्या नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. हा संपूर्ण महत्त्वाकांक्षी प्रकल्प समुद्रात सुमारे ११० हेक्टर क्षेत्राचे पुनर्भरण (रिक्लेमेशन) करून तयार करण्यात आला आहे. या अथांग क्षेत्रापैकी ७० हेक्टर क्षेत्र केवळ हरितीकरण आणि उद्यान विकासासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या राखीव क्षेत्रातील ४.८ हेक्टरचा मध्यभाग टाटा समूहाने आधीच विकसित केला असून, ११ हेक्टर क्षेत्र महापालिकेने स्वतः प्रॉमेनेड म्हणून विकसित केले आहे.

५१ हेक्टर क्षेत्रावर केले जाणार भव्य लँडस्केपिंग

आता उर्वरित क्षेत्रापैकी सुमारे ५१ हेक्टर क्षेत्रावर रिलायन्स इंडस्ट्रीजकडून भव्य लैंडस्केपिंग केले जाणार आहे, तर उरलेल्या काही भागाचा विकास महापालिका स्वतः करणार आहे.रिलायन्सच्या या प्रस्तावित आराखड्यात समुद्रकिनाऱ्यालगत फेरफटका मारण्यासाठी ‘बीच बोर्डवॉक’, विविध मैदानी खेळांसाठी अत्याधुनिक ‘स्पोर्ट्स अरेना’, मुलांसाठी आणि कुटुंबांसाठी विरंगुळा क्षेत्र, दुर्मिळ पक्षांसाठी ‘अॅव्हियरी’, प्राण्यांशी थेट संवाद साधता येईल, असे ‘पेटिंग झू’, सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी देणारे भव्य ‘अॅम्फीथिएटर’ आणि मुंबईची क्षितीजरेषा उंचावरून न्याहाळण्यासाठी ‘फेरिस व्हील’ यांसारख्या आकर्षणांची मेजवानी असणार आहे.

Operation Tiger: अरे देवा! मुंबई पालिकेत पण ऑपरेशन टायगर २.०? ३५ नगरसेवक संपर्कात; किरण लांडे यांचा दावा

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबईकरांना आणि पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यालगत विस्तीर्ण खुल्या जागा, विरंगुळ्याची आधुनिक साधने आणि निसर्गरम्य हरित परिसर उपलब्ध होणार आहे. मुंबईचा हा कोस्टल रोड परिसर आगामी काळात शहरातील केवळ एक वाहतूक मार्ग न राहता, देशातील प्रमुख सार्वजनिक आणि पर्यटन आकर्षणाचे केंद्र ठरेल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: World class tourism hub to be developed on the coastal road reliance to transform 51 hectares

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • coastal road
  • Maharashtra Road
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: सर्पदंशाचे मृत्यू निम्म्यावर आणण्यासाठी रोडमॅप! सर्पदंशापासून उपचारापर्यंतची संपूर्ण साखळी मजबूत करण्यावर भर
1

Mumbai News: सर्पदंशाचे मृत्यू निम्म्यावर आणण्यासाठी रोडमॅप! सर्पदंशापासून उपचारापर्यंतची संपूर्ण साखळी मजबूत करण्यावर भर

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार
2

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले
3

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
4

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.