File Photo : Yashashri shinde
नवी मुंबई: उरणमधील यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरूणीच्या हत्येमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असतानाच या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून आरोपीने यशश्रीचे हालहाल करून तिची निर्घृणपणे हत्या केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर तिच्या मृतदेहाची विटंबनाही केली. तिच्या गुप्तांगांवर आणि पोटावर वार करून तिचा मृतदेह छिन्नविछिन्न केला होता.
25 जुलैपासून यशश्री बेपत्ता होती. उरणमधील सगीर ब्रदर्स पेट्रोल पंपामागे असलेल्या मैदानातील झुडुपांत तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना तिच्या मृतदेहाचा पत्ता लागेपर्यंत कुत्र्यांनी अक्षरश: तिच्या मृतदेहाचे लचके तोडले होते. तिच्य मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी अखेर तिच्या आई-वडिलांना घटनास्थळी बोलवण्यात आले. तिचे कपडे आणि तिच्या अंगावरील टॅटूवरुन ओळख पटवण्यात आली. या घटनेमुळे उरणसह संपूर्ण राज्यातून संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणातील संशयित आरोपी दाऊद शेखवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
उरण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2018 साली दाऊदने यशश्रीला पहिल्यांदा पाहिले होते. तेव्हा ती केवळ 15 वर्षांची होती. दाऊद शेख हा एक ट्रक ड्रायव्हर आहे. यशश्रीशी ओळख वाढवून दाऊदने तिला जाळ्यात ओढले आणि 2019 साली तिच्यावर अत्याचारही केला होता. यशश्री आणि तिच्या कुटुंबियांन दिलेल्या तक्रारीनुसार, दाऊदवर पॉक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करत त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली. तो काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटला होता. पण बाहेर येताच त्यांने पुन्हा यशश्रीचा पाठलाग सुरू केला. फोन करून तो तिला त्रास देत होता.
याच काळात यशश्री शिक्षण घेता घेता एका कॉलसेंटरमध्ये नोकरी सुरू केली होती. गुरूवारी (25 जुलै) यशश्री नोकरीवर जाण्यासाठी घराबाहेर पडली. दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान, सायंकाळी साधारण साडेचार वाजण्याच्या सुमारास मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी यशश्री पनवेल स्टेशनकडे गेली. त्यानंतर तिचा फोन बंद झाला. तेव्हापासून ती कोणालाच दिसली नाही. पण दाऊदने तिला गाठून तिची हत्या केल्याचा संशय आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात यशश्रीच्या वडिलांनी दाऊद शेख नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला होता. मृत्यूपूर्वी यशश्रीवर बलात्कार केला होता की, याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
दरम्यान, बेलापूर येथे एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती. 25 जुलैला ती कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. तेव्हापासून ती बेपत्ता होती. यशश्रीचा 27 जुलैला मृतदेह सापडला तेव्हा त्याची अवस्था खूपच भयानक होती. मृतदेहावर चाकूने वार केलेले होते. मृतदेहावर असंख्य जखमाही होत्या. कुत्रे मृतदेहाचे लचके तोडत होते. तिच्या हत्येनंतर तिच्या आई- वडिलांनी दाऊद शेखनेच तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी यशश्रीचे कॉल रेकॉर्ड तपासले असता एका नंबरवर यशश्री बराच काळ बोलत असल्याचे आढळून आले आहे. या नंबरवरून यशश्रीला कॉल येतही होते आणि जातही होते. नंबरचे डिटेल्स पाहिले तेव्हा हा नंबर दाऊद शेखचाच असल्याचेही दिसून आले आहे. त्यानंतर पोलिसांनी दाऊदचा शोध सुरू केला. यशश्री बेपत्ता झाल्यापासून दाऊदचा फोनही बंद लागत आहे. पण तुरुंगात पाठवलेल्या तरुणासोबतच यशश्री संपर्क का ठेवत होती, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यशश्री तासन् तास दाऊदशी फोनवरून बोलत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.