उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (फोटो- सोशल मीडिया)
बिबटच्या विषयात स्वतः लक्ष घालणार – एकनाथ शिंदे
पिंपरखेड येथील बोंबे यांच्या कुटुंबाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद
परिसर बिबट मुक्त करण्याचा ग्रामस्थांची मागणी
पारगाव शिंगवे: पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या दुर्घटना अतिशय दुर्दैवी व दुःखद आहेत, समोरच्या कुटुंबाचा पोटच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेल्याने बळी गेले आहेत. हा परिसर बिबट मुक्त करण्याचा ग्रामस्थांची मागणी आहे. हा परिसर बिबट मुक्त करण्याचा शासन निर्णय घेणार आहे. यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिरूर तालुक्यात पिंपरखेड येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावातील रोहन विलास बोंबे या कुटुंबाची भेट घेतली व ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
स्थानिक आमदार उपस्थित न राहिल्याने आक्रोश
पिंपरखेड गावातील रोहन विलास बोंबे या १३ वर्षीय चिमुकल्याचा काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. व कु.शिवन्या शैलेश बोंबे व जांबुत येथील श्रीमती भागूबाई जाधव या आजींचाही याच पंधरवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी व शेतकऱ्यांनी मंचर येथे पुणे नाशिक महामार्गावर तब्बल अठरा तास महामार्ग रोखून नागरिकांनी आंदोलन केले होते. राज्य सरकारचे वनमंत्री, पालकमंत्री व स्थानिक आमदार घटनास्थळी उपस्थित न राहिल्याने जनतेमध्ये आक्रोश होता.आज पुणे दौऱ्यावर असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री .एकनाथ शिंदे यांनी पिंपरखेड येथे भेट देऊन मृत मुलाच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले तसेच परिसरातील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत सविस्तर माहिती घेतली.
Leopard News: ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण! आता ‘या’ भागात झाले बिबट्याचे दर्शन
राज्य सरकार ठोस व तातडीची पावले उचलेल
बोंबे यांच्या घराकडे जाणारा रस्ता नसल्याने त्यांनी एक किलोमीटर शेतातून पायी जात या कुटुंबीयांची भेट घेतली व या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत संबंधित विभापगाला पक्का रस्ता उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. या परिसरात पानमंद रस्ता व्हावा म्हणून या खात्याचे संबंधित मंत्री भरत गोगावले यांना लवकरच या परिसराचा दौरा करायला सांगणार आहे तसेच नागरी वस्तीमध्ये बिबट्यांचा वाढलेला वावर आणि माणसांवरील वाढते हल्ले ही गंभीर बाब आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार ठोस व तातडीची पावले उचलेल.
आला रे आला! सावजाच्या मागे आला बिबट्या अन्…; अंगणात बसलेला चिमुकला बचावला, पहा थरारक Video
सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मोहीम सुरू
बिबट्यांना पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मोहीम सुरू आहे आणि आता तातडीने ही मोहीम व्यापक करून या भागातील सर्व बिबटे पकडून त्यांना स्थलांतरित करावेत असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले. तसेच, बिबट हल्ल्यांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना शासनस्तरावरून योग्य आर्थिक सहाय्य मिळेल याची खात्री देण्यात आली. तसेच मृत्युमुखी पडलेल्या रोहन विलास बोंबे यांच्या घराची अवस्था पाहून त्यांना घर बांधून देणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.






