फोटो सौजन्य - Social Media
नोकरी ही केवळ पगार मिळवण्याचं साधन नसून, आपल्या व्यक्तिमत्त्वाचं आणि करिअरचं प्रतिबिंब असते. पण अनेकजण नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे त्यांची प्रतिमा, कामगिरी आणि भविष्यातील संधींवर वाईट परिणाम होतो. या चुका टाळल्या तर करिअर अधिक स्थिर आणि यशस्वी होऊ शकतं.
वेळेचं महत्त्व न समजणं
नेहमी उशिरा ऑफिसला जाणं किंवा डेडलाइन पाळण्यात कसूर करणं ही मोठी चूक आहे. वेळेचं पालन केल्याने वरिष्ठांमध्ये विश्वास निर्माण होतो.
निगेटिव्ह दृष्टिकोन ठेवणं
ऑफिसमधील वातावरण कितीही ताणतणावाचं असलं तरी सतत तक्रारी करणं, इतरांवर दोष टाकणं टाळा. सकारात्मक दृष्टी ठेवा. यामुळे टीमवर्क सुधारतो.
ऑफिस पॉलिटिक्समध्ये गुंतणं
कार्यालयीन राजकारणात अडकून कामापेक्षा गॉसिपवर लक्ष केंद्रीत करणं धोकादायक ठरू शकतं. नेहमी व्यावसायिक राहा आणि आपल्या कामावर लक्ष द्या.
शिकणं थांबवणं
जुनी पद्धत वापरत राहणं आणि नवीन कौशल्यं शिकण्याकडे दुर्लक्ष करणं ही करिअर थांबवणारी चूक आहे. वेळोवेळी स्वतःला अपडेट करा.
वरिष्ठांशी संवाद न ठेवणं
काम कितीही चांगलं असलं तरी संवाद नसेल, तर ते दिसत नाही. आपल्या प्रगतीबद्दल आणि आव्हानांबद्दल वरिष्ठांना वेळोवेळी माहिती द्या.
सोशल मीडियावर गैरवर्तन
ऑफिस, सहकारी किंवा कंपनीबद्दल नकारात्मक पोस्ट करणं टाळा. हे तुमच्या व्यावसायिक प्रतिमेला धक्का देऊ शकतं.
व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्याची सीमारेषा विसरणं
नोकरीचं ओझं घरात आणि घरातील ताण ऑफिसमध्ये नेऊ नका. दोन्ही ठिकाणी संतुलन ठेवा.
फीडबॅक न घेणं
तुमच्या चुका सुधारण्यासाठी फीडबॅक महत्त्वाचा असतो. टीका आली तरी तिला वैयक्तिक न समजता शिकण्याची संधी समजा.
टीमवर्ककडे दुर्लक्ष करणं
फक्त स्वतःचं यश बघणं आणि टीमच्या उद्दिष्टाकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. सहकाऱ्यांबरोबर सहयोगी पद्धतीने काम करा.
जबाबदारी टाळणं
कामातील जबाबदारीपासून पळ काढणं हे वरिष्ठांना लक्षात येतं. प्रत्येक काम मनापासून आणि प्रामाणिकपणे करा.
नोकरी म्हणजे फक्त काम नव्हे, तर ती शिकण्याची आणि वाढीची संधी असते. या छोट्या चुका टाळल्या, तर तुमचं करिअर निश्चितच मजबूत पायावर उभं राहील.






