Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yashomati Thakur: “मेळघाट कुपोषण प्रकरणी काय उपाययोजना केल्या?” यशोमती ठाकूर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल

अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर २०२४ या महिन्यात धारणी तालुक्यात शुन्य ते ५ वर्षे वयो गटातील एकूण २० हजार ३८० बालकांपैकी १४ हजार १२६ सर्वसाधारण वजन व उंचीची होती.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 22, 2025 | 12:22 PM
यशोमती ठाकूर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल (फोटो सौजन्य-X)

यशोमती ठाकूर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : अमरावती मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यात नोव्हेंबर २०२४ मध्ये १० हजार कुपोषित बालके आढळून आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून काँग्रेसच्या नेत्या व राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांना धारेवर धरत सरकारने यावर काय उपाययोजना केल्या ? असा सवाल यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला आहे.

Waqf Act : वक्फ कायद्याविरोधात आंदोलन पेटणार; देशातील सर्व मुस्लिम संघटना सहभागी होणार

माहिती अधिकारातून मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यात नोव्हेंबर २०२४ मध्ये १० हजार कुपोषित बालके आढळल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर २०२४ या महिन्यात धारणी तालुक्यात शुन्य ते ५ वर्षे वयो गटातील एकूण २० हजार ३८० बालकांपैकी १४ हजार १२६ सर्वसाधारण वजन व उंचीची होती.

४ हजार ९६४ बालके कमी वजनाची तर १ हजार २९० बालके तीव्र कमी वजनाची अशी एकूण ६ हजार २५४ बालके कुपोषित होती. चिखलदरा तालुक्यातील १३ हजार ९६४ बालकांपैकी ९ हजार ८६० बालके सर्वसाधारण वजन व उंचीची तर ३ हजार ३१६ बालके कमी वजनाची, ७८८ बालके तीव्र कमी वजनाची अशी एकूण ४ हजार १०४ बालके कुपोषित होती.

कुपोषणाच्या प्रश्नाबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने यावर उपाययोजना केल्या असल्याचे स्पष्ट केले आहे, यावर यशोमतीताई यांनी सवाल उपस्थित करत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री आबिटकर यांना नेमक्या काय उपाययोजना केल्या? असा सवाल केला आहे.

मेळघाटमधील कुपोषणाचा प्रश्न गंभीर

मेळघाटमधील बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न अतिशय गंभीर असून ही अतिशय चिंतेची बाब असल्याचे देखील ठाकूर यांनी म्हटले आहे. एका महिन्यात जर एवढी कुपोषित बालके आढळत असतील तर तत्पूर्वी ज्या उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या नेमक्या काय करण्यात आल्या? असा सवाल ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. याची अधिकची दखल शासन-प्रशासनाने घेण्याची गरज आहे.

संबंधीत यंत्रणांना उपाययोजनांचे आदेश द्यावेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन संबंधीत यंत्रणांनाकडून आढावा घ्यावा आणि मेळघाटातील कुपोषण, उपजत मृत्यू आणि मातामृत्यू रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत आदेश द्यावेत अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

 ठाकरे बंधूंनंतर आता पवार कुटुंबात एकतेची चर्चा! संजय राऊत म्हणाले, “राजकीय दृष्ट्या ते एकत्र आले…’

Web Title: Yashomati thakur questions cm devendra fadnavis what measures were taken in the melghat malnutrition case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • Congress
  • devendra fadnavis
  • maharashtra
  • Yashomati Thakur

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
2

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
3

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
4

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.