Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, उदयनराजे करणार नरेंद्र मोदींकडे शिफारस

मोदींच्या या दौऱ्यावेळी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना देशाच्या विकासातील योगदान लक्षात घेत त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी शिफारस करणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 26, 2024 | 06:40 PM
यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, उदयनराजे करणार नरेंद्र मोदींकडे शिफारस
Follow Us
Close
Follow Us:

वाई – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी काही आश्वासने दिली आहेत. उदयनराजे यांना सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून तिकीट मिळाले आहे. त्यांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये येणार आहेत. मोदींच्या या दौऱ्यावेळी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना देशाच्या विकासातील योगदान लक्षात घेत त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी शिफारस करणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

त्यांच्या नावाचा केवळ निवडणुकीपुरता वापर केला

पुढे उदयनराजे भोसले यांनी यशवंतराव चव्हाण यांची कारकीर्द सांगितली. ते म्हणाले, दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांनी देखील देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. परकीय आक्रमणाच्या काळात त्यांनी देशाचे संरक्षण मंत्रीपद भूषवले. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला असे त्यामुळेच म्हटले जाते. यशवंत विचार हा लोककल्याणाचा विचार आहे. काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा केवळ निवडणुकीपुरता वापर केला पण त्यांचे विचार आचरणात आणले नाहीत, असा टोला देखील उदयनराजे भोसले यांनी लगावला.

काँग्रेसला भारतरत्न पुरस्कार देण्याचे सुचले नाही

“एवढे मोठे व्यक्तिमत्व महाराष्ट्रात होऊन गेले तरी देखील काँग्रेसला भारतरत्न पुरस्कार देण्याचे सुचले नाही. काँग्रेसला ‘आऊट ऑफ साईट आऊट ऑफ माईंड’ हे सूत्र लागू होतं. यशवंतरावांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे कर्तव्य आम्ही पार पडणार आहोत,” असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. तसेच “काही लोकांनी स्वार्थापुरता यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा वापर केला, त्यांनाही यशवंतरावांना भारतरत्न द्यावा असे वाटले नाही,” अशी अप्रत्यक्ष टीका शरद पवार यांच्यावर केली. त्यांनी नाव न घेता काँग्रेससह शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केली.

Web Title: Yashwantrao chavan should be given bharat ratna udayanaraje bhosale will recommend to pm narendra modi loksabha elections 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2024 | 06:40 PM

Topics:  

  • loksabha elections 2024
  • political news
  • Udayanraje Bhosale

संबंधित बातम्या

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार
1

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम लवकरच होणार जाहीर; अडीच वर्षांपासून जागा रिक्त
2

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम लवकरच होणार जाहीर; अडीच वर्षांपासून जागा रिक्त

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी साधला सरकारवर निशाणा
3

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी साधला सरकारवर निशाणा

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आवाहनाचा राज ठाकरेंकडून खरपूस समाचार; म्हणाले, ‘मग शेकडो गाड्यांचा ताफा…’
4

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आवाहनाचा राज ठाकरेंकडून खरपूस समाचार; म्हणाले, ‘मग शेकडो गाड्यांचा ताफा…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.