Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार

Thane News : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण महासभेत भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. भाजपच्या नगरसेवकांनी पूर्वनियोजन करून गोंधळ घालण्याचे कारस्थान केले असा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 16, 2026 | 06:38 PM
Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार
Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले
  • ‘भाजपच्या नगरसेवकांनी पूर्वनियोजन करून कारस्थान केले’, शिंदे गटाचा सणसणीत आरोप
ठाणे : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण महासभेत भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. भाजपच्या नगरसेवकांनी पूर्वनियोजन करून गोंधळ घालण्याचे कारस्थान केले असा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. एवढंच नाही तर चोराच्या उलट्या बोंबा मारून शिवसेना नगरसेवक मनोज शिंदे आणि राजेश मोरे यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला असा आरोप भाजप गटाने केला. त्याशिवाय नौपाडा पोलिस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला आणि यामुळे मनोज शिंदे आणि राजेश मोरे यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले, अशी भुमिका शिवसेनेने घेतली.

शिवसेनेच्या म्हणण्यानुसार, मुळात सत्य परिस्थिती अशी आहे की सर्वसाधारण महासभेच्या आधी महापौरांच्या दालनात, महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक होते ज्यात प्रत्येक पक्षाचे गटनेते व पदाधिकारी उपस्थित असतात आणि त्यामध्ये महासभेची भूमिका ठरवली जाते.

15 मे रोजीच्या महासभेत एकूण 233 विशेष प्रकरणे होती तसेच 1 लक्षवेधी होती. याव्यतिरिक्त सदस्यांचे प्रश्न होते. त्यावेळी सर्वानुमते सर्वात आधी लक्षवेधीवर चर्चा करण्याचे ठरले त्यानंतर प्रकरणे जास्त असल्यामुळे प्रत्येक प्रकरणावर चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले. तसेच प्रश्नोत्तराचा तास घेण्याचे ठरविण्यात आले.महासभेच्या दिवशी लक्षवेधीवर चर्चा केली गेली परंतु फक्त पूर्वनियोजित हेतुपुरस्सर प्रकरणावर चर्चा करण्याचे टाळून भाजप नगरसेवकांनी प्रश्नोत्तराचा आग्रह धरला, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं.

“तर मी राजीनामा द्यायला तयार,” मराठा आरक्षणावरून राधाकृष्ण् विखे पाटील यांचे मोठे विधान

भाजप-शिंदे गटात आरोप प्रत्यारोपांची मालिका

ठाणे शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रकरणांवर निर्णय घेणे अत्यंत गरजेचे होते. त्यामुळे सभागृह नेता हनुमंत जगदाळे यांनी प्रकरणावर निर्णय घेण्याची विनंती केली व आपले गट मिटिंगमध्ये ठरलेले नसताना देखील आपण आग्रह का धरत आहात अशी विचारणा केली. भाजप नगरसेवकांनी यावर आम्ही सभात्याग करू, महापौरांना वेठीस धरू, महासभा चालू देणार नाही असे जोरजोरात आवाज करून वातावरण तंग करण्याचे काम केले, अशी भुमिका ठाणे शिवसेना गटाने मांडली.

महापौरांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुळात भाजपच्या नगरसेवकांनी विचारलेले प्रश्न हे निविदा, शहर विकासाच्या संदर्भात भ्रष्टाचाराचा हेतू ठेवून केलेले होते आणि त्यासाठीच त्यांचा हा अट्टाहास असावा. त्यामुळे भाजपचे नगरसेवक वगळता इतर सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपच्या गोंधळास न जुमानता (भीक न घालता) लोकोपयोगी सर्व प्रकरणे मंजूर केली. त्यानंतर देखील भाजपच्या नगरसेवकांनी जेव्हा महापौरांच्या डायस समोर बसून महापौरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नियमानुसार महापौरांनी सभा संपल्याचे जाहिर केले आणि राष्ट्रगीतास सुरुवात झाली तरीदेखील भाजपचे बरेचसे नगरसेवक न उठता राष्ट्रगीताचा अवमान केला. शिवसेना मुर्दाबाद चे नारे लावले, घोषणा केल्या आणि चोराच्या उलट्या बोंबा मारून दिशाभूल करण्याच्या हेतूने मनोज शिंदे आणि राजेश मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु मनोज शिंदे आणि राजेश मोरे यांनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याचे सिद्ध न झाल्याने नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. या सगळ्या प्रकरणावर  मनोज शिंदे यांनी महापौरांना, भाजपच्या नगरसेवकांना महापौरांच्या अंगावर धाऊन जाण्याच्या प्रकरणी निलंबित करा असे पत्र दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या नगरसेवकांना योग्य तो समज द्यावा असं शिवसेनेच्या महापौरांनी निवेदनात म्हटलं आहे.

NCP मध्ये नवे सत्तासमीकरण! फक्त राज्यसभा सदस्य की पक्षातील नवी ताकद? NCP मध्ये पार्थ-जय पवारांवर चर्चांना उधाण

Web Title: Thane news politics heats up in thane over allegations of insulting the national anthem shiv sena counterattacks bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • BJP
  • BJP-Shivsena
  • navrashtra news
  • political news
  • Thane news

संबंधित बातम्या

‘सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही’; कायदा-सुव्यवस्थेवरून सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
1

‘सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही’; कायदा-सुव्यवस्थेवरून सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

मोठी बातमी! भाजप आणि शरद पवार गटाची हातमिळवणी; महायुतीत जाण्याच्या चर्चांना बळ
2

मोठी बातमी! भाजप आणि शरद पवार गटाची हातमिळवणी; महायुतीत जाण्याच्या चर्चांना बळ

‘दानपेटी लुटणाऱ्यांसोबत जाणार का?’ शरद पवारांच्या NDA चर्चांवर आदित्य ठाकरेंचा थेट सवाल
3

‘दानपेटी लुटणाऱ्यांसोबत जाणार का?’ शरद पवारांच्या NDA चर्चांवर आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

अमित शाह-देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बंद दाराआड बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणावरून मोठी खलबतं?
4

अमित शाह-देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बंद दाराआड बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणावरून मोठी खलबतं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.