Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेतीतस्करांविरुद्ध महसूल परिवहन विभागाचे कठोर धोरण! रेतीमाफियांचा वाहन परवाना रद्द होण्याची शक्यता

अनेकदा रेतीमाफिया दंड भरण्यास विरोध करतात आणि पकडले जाऊ नये, म्हणून वाहने थेट सरकारी कर्मचाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करतात.ज्यांच्यामुळे परिसरात तणाव आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 11, 2025 | 02:27 PM
रेतीतस्करांविरुद्ध महसूल परिवहन विभागाचे कठोर धोरण! रेतीमाफियांचा वाहन परवाना रद्द होण्याची शक्यता

रेतीतस्करांविरुद्ध महसूल परिवहन विभागाचे कठोर धोरण! रेतीमाफियांचा वाहन परवाना रद्द होण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:

रेतीमाफियांचे परवाने का होणार रद्द?
रेतीतस्करांविरुद्ध महसूल परिवहन विभागाकडून कोणती कारवाई?
किती टप्प्यांमध्ये होणार कारवाई?

उमरखेड यवतमाळ: राज्यातील रेतीतस्करी रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आता रेतीतस्करी करणारे वाहन तीनवेळा पकडले गेल्यास त्या वाहनाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करून वाहनही जप्त केले जाणार आहे. यवतमाळमध्ये महसूल विभागाने याबाबतचे शासन परिपत्रक जारी केले.(फोटो सौजन्य – AI)

Cash Bomb video: अंबादास दानवेंना तो व्हिडीओ सुनील तटकरेंनी पाठवला? शिंदेच्या आमदाराच्या आरोपाने नव्या वादाची ठिणगी

राज्यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या रेती आणि इतर गौण खनिजांच्या चोरीमुळे सरकारी महसुलाची आणि पर्यावरणाची मोठी हानी होते. याशिवाय अवैध व्यवसायातून गुन्हेगारी वाढत असून कारवाईसाठी जाणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अवैध गौण खनिजांच्या वाहतुकीसाठी वापरले जाणारे ड्रील मशीन, जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर-ट्रॉली, डम्पर यासारख्या सर्व प्रकारच्या वाहनांवर, तसेच अवैध उत्खनन करणाऱ्या साधनांवर ही कारवाई केली जाणार आहे. महसूल आणि परिवहन विभागाने एकत्रितपणे हे कठोर धोरण लागू केले आहे. रेतीमाफियांकडून होणारीशासनाची फसवणूक आणि पर्यावरणाचा हास थांबवणे हे या कारवाईचे मुख्य उद्दिष्ट आहे. केवळ रेतीच नाही, तर इतर गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवरही ही कारवाई होणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या अंगावर घालतात वाहने अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेले तहसीलदार, तलाठी यासारखे महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाला वारंवार धोका निर्माण झाला आहे. अनेकदा रेतीमाफिया दंड भरण्यास विरोध करतात आणि पकडले जाऊ नये, म्हणून वाहने थेट सरकारी कर्मचाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करतात. अवैध रेती आणि गौण खनिजांच्या या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात संघटित गुन्हेगारी वाढली आहे. अनेक ठिकाणी रेतीमाफियांच्या टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. ज्यांच्यामुळे परिसरात तणाव आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

देशातील पहिला Indoor Live एंटरटेनमेंट अरेना नवी मुंबईत, सिडकोतर्फे प्रकल्प उभारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

अशी होणार कारवाई:

पहिला गुन्हा परवाना (परमिट) ३० दिवसांसाठी निलंबित करणे आणि वाहन तत्काळ अटकवून ठेवणे.
दुसरा गुन्हा : परवाना (परमिट) ६० दिवसांसाठी निलंबित करणे आणि वाहन अटकवून ठेवणे.
तिसरा गुन्हा : संबंधित वाहनाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करणे आणि पुढील कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत वाहन जप्त करणे.

Web Title: The revenue and transport department has adopted a strict policy against sand smugglers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 02:27 PM

Topics:  

  • maharashtra
  • Yavatmal
  • yavatmal news

संबंधित बातम्या

ज्युनिअर भारतीय Hockey संघात महाराष्ट्राच्या लेकीची निवड; तनू थेट इंग्लंडमध्ये उडवणार धुरळा…
1

ज्युनिअर भारतीय Hockey संघात महाराष्ट्राच्या लेकीची निवड; तनू थेट इंग्लंडमध्ये उडवणार धुरळा…

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत झळकणार शिरूरची अनघा शिंदे; शिरूरच्या शिरपेचात मानाचा तुरा
2

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत झळकणार शिरूरची अनघा शिंदे; शिरूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Satara News : लग्नाची सनई वाजण्याआधीच पोलिसांचा सायरन! रहीमतपूरमध्ये १५ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला
3

Satara News : लग्नाची सनई वाजण्याआधीच पोलिसांचा सायरन! रहीमतपूरमध्ये १५ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला

‘गद्दार खासदार जिथे सापडतील तिथेच..’; उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना थेट आदेश, भाजपवरही घणाघात
4

‘गद्दार खासदार जिथे सापडतील तिथेच..’; उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना थेट आदेश, भाजपवरही घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.