Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal News: बोगस बियाण्याचा फटका! साडेसहा एकरातील सोयाबीन उगवलंच नाही, संतप्त शेतकऱ्याने फिरवला रोटावेटर

पावसाच्या अनिश्चिततेनंतर पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांना आता निकृष्ट बियाण्यांचा फटका बसला आहे. शेतात सोयाबीनऐवजी केवळ तण दिसून येत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 25, 2026 | 02:27 PM
Yavatmal News: बोगस बियाण्याचा फटका! साडेसहा एकरातील सोयाबीन उगवलंच नाही, संतप्त शेतकऱ्याने फिरवला रोटावेटर

Yavatmal News: बोगस बियाण्याचा फटका! साडेसहा एकरातील सोयाबीन उगवलंच नाही, संतप्त शेतकऱ्याने फिरवला रोटावेटर

Follow Us
Follow Us:
  • साडेसहा एकरात सोयाबीनची पेरणी करूनही उगवण न झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
  • बियाणे कंपनीच्या प्रतिनिधींनी शेताची पाहणी केली, मात्र नुकसानभरपाईबाबत अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही.
  • निकृष्ट बियाण्याची चौकशी करून दोषींवर कारवाई आणि बाधित शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
यवतमाळ: बोगस सोयाबीन बियाण्यामुळे पेरणी करूनही उगवण न झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील लोणी येथील संतप्त शेतकऱ्याने साडेसहा एकर शेतात रोटावेटर फिरवून आपला संताप व्यक्त केला. बियाण्याच्या निकृष्टतेमुळे आर्थिक नुकसान झाल्याची खंत शेतकरी ज्ञानेश्वर गोटफोडे यांनी व्यक्त केली.

Raigad News: पेणमध्ये आदिवासींचा भव्य मेळावा; प्रलंबित दावे, वारस नोंदणी आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी जोरदार मागणी

यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाच्या अनिश्चिततेनंतर पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांना आता निकृष्ट बियाण्यांचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. त्यांनी जून महिन्याच्या अखेरीस साडेसहा एकर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी केली होती. पेरणीपूर्व मशागत, बियाणे, खते आणि इतर खर्चासाठी त्यांनी हजारो रुपये खर्च केले. मात्र, पेरणीनंतर अपेक्षित उगवण झाली नाही.  (फोटो सौजन्य – AI Created) 

शेतात सोयाबीनऐवजी केवळ तण दिसून आल्याने त्यांनी अखेर संपूर्ण क्षेत्रावर रोटावेटर फिरवून पीक नष्ट केले. याबाबत त्यांनी संबंधित बियाणे कंपनीकडे तक्रार केली होती. कंपनीच्या प्रतिनिधींनी शेताची पाहणी केली; मात्र केवळ पाहणी करून नुकसान भरपाई मिळणार नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. बियाण्याच्या निकृष्टतेमुळे साडेसहा एकर क्षेत्रातील पीक हातचे गेले असून, केलेला खर्च वाया गेल्याचे गोटफोडे यांनी सांगितले.

चौकशी करून नुकसानभरपाईची मागणीः या प्रकरणात संबंधित बियाण्याची गुणवत्ता, उगवण क्षमता आणि विक्री प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. बियाणे निकृष्ट असल्यास संबंधित कंपनी व दोषींवर कारवाई करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे.

हिरव्यागार पिकाची आशा, क्षणात मात्र माती

गोटफोडे यांनी हिरव्यागार सोयाबीन पिकाचे स्वप्न रंगवले होते. मात्र, शेतात सोयाबीनऐवजी तणाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्याने संतप्त होऊन त्यांनी संपूर्ण शेतात रोटावेटर फिरविला. काही दिवसांपूर्वी चांगल्या पिकाची आशा असलेल्या शेतात पुन्हा माती उलटविण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांच्या हतबलतेचे चित्र समोर आले आहे.

पुणे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादीचा वाद पेटला; सुनील टिंगरेंचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

निसर्गाच्या लहरीपणाचाही बसला फटका

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलाच पण त्यात बियाण्याची उगवणही झाली नाही. साडेसहा एकर क्षेत्रासाठी मशागत, बियाणे व पेरणीवर हजारो रुपये खर्च केले, कंपनीच्या प्रतिनिधींनी पाहणी केली; मात्र माझ्या नुकसानाचे काय, हा प्रश्न कायम आहे. शेतात सोयाबीनाऐवजी केवळ तणकट ठरल्याने अखेर रोटावेटर फिरवावा लागला.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Yavatmal farmer destroys soybean crop after poor germination allegedly due to substandard seeds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • Yavatmal

संबंधित बातम्या

France News : विज्ञानालाही थक्क करणारे दृश्य! आकाशात उमटल्या लाल रंगाच्या विजेच्या शाखा
1

France News : विज्ञानालाही थक्क करणारे दृश्य! आकाशात उमटल्या लाल रंगाच्या विजेच्या शाखा

Sugarcane Farmers Protest : दिल्लीतील बैठक निष्फळ; आज महाराष्ट्र-कर्नाटक महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा
2

Sugarcane Farmers Protest : दिल्लीतील बैठक निष्फळ; आज महाराष्ट्र-कर्नाटक महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Mumbai News : धम्मचक्र दिनानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेची ‘धम्म समता जागृती बाईक रॅली; १४ ऑक्टोबरला मुंबईत आयोजन
3

Mumbai News : धम्मचक्र दिनानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेची ‘धम्म समता जागृती बाईक रॅली; १४ ऑक्टोबरला मुंबईत आयोजन

Mira Road News : राज ठाकरेंच्या घोषणेनंतर मनसे आक्रमक; मीरा रोडमध्ये सह्यांची मोहीम, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी!
4

Mira Road News : राज ठाकरेंच्या घोषणेनंतर मनसे आक्रमक; मीरा रोडमध्ये सह्यांची मोहीम, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.