Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

St Bus App : एसटी बस कुठे पोहचली आहे? आता मोबाईलवरच ठावठिकाणा कळणार; कसं ते जाणून घ्या

एसटी स्टँडवर गेलो की गावाकडे जाणारी एसटी कुठे लागणार, आता ती आहे कुठे, यायला किती वेळ लागणार, गाडीत रिझर्व्हेशन किती इ. इ. माहिती आता प्रवाशांना एका क्लिकसरशी मिळणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 02, 2025 | 01:43 PM
एसटी बस कुठे पोहचली आहे? आता मोबाईलवरच ठावठिकाणा कळणार; कसं ते जाणून घ्या

एसटी बस कुठे पोहचली आहे? आता मोबाईलवरच ठावठिकाणा कळणार; कसं ते जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा, यासाठी ” आपली एसटी ” या नावाने नवीन ॲप चे दसऱ्याच्या मुहूर्तावरण लोकार्पण करण्यात आले. भविष्यात प्रवाशांना त्याचा चांगला फायदा होणार आहे. तसेच १२ हजार पेक्षा जास्त बसेस व राज्यभरातील १ लाख पेक्षा जास्त मार्गाचे मॅपिंग करून हे ॲप विकसित केले आहे. भविष्यात लाखो प्रवासी याचा वापर करणार असल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्यास, प्रवाशांनी त्या जरूर सुचित कराव्यात ,असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. जेणेकरून एक परिपूर्ण ॲप विकसित करण्यास मदत होईल.

आपली एसटी एक मराठमोळे नाव

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सोयीसाठी कम्यूटर ॲप नव्या रुपात सादर केलं असून आता या ॲपला ‘आपली एसटी’ (Aapli ST) असे मराठमोळे नाव परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. अर्थात, या ॲपमुळे सर्वसामान्य मराठी प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि पारदर्शक होईल यावर अधिक भर दिला जाणार आहे.

गांधी जयंतीच्या दिवशीच गांधींचा अनुयायी हरपला ; युसुफ मेहेरअली सेंटरचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक डॉ.जी.जी. पारीख अनंतात विलीन

‘रोजमाल्टा ऑटोटेक लि.’ या कंपनीच्या सहाय्याने विकसित केलेल्या ” आपली एसटी “(Aapli ST) ॲपमुळे प्रवासी आपल्या जवळच्या बसस्थानकाची माहिती मिळवू शकणार असून प्रवासी माहिती केंद्राद्वारे (‘Passenger Information System’ ) बस कुठून सुटणार (STD) आणि ती बस थांब्यावर केव्हा पोहोचणार (ETA) याची वस्तुस्थिती जन्य (रिअल-टाइम) माहिती मिळेल. त्यामुळे प्रवाशांना थांब्यावर थांबून वेळ घालवण्याची गरज नाही, तर ते थेट बस उपलब्धतेनुसार थांब्यावर पोहोचू शकतील.

ॲपमध्ये अँड्रॉइड आणि ॲपल वापरकर्त्यांसाठी अनेक उपयुक्त सुविधा (फीचर्स )उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यात प्रवाशांना आपल्या जवळच्या बस थांब्याचा शोध घेणे, दोन थांब्यांदरम्यान चालणाऱ्या बसच्या वेळापत्रकाची माहिती पाहणे, आरक्षण केलेल्या तिकीटातील बस क्रमांक अथवा सेवा क्रमांक टाकून बसची थेट मागोवा (लाईव्ह ट्रॅकिंग करणे) घेणे, यांचा समावेश आहे.

याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ॲपमध्ये आपत्कालीन क्रमांकांची यादी देखील देण्यात आली असून, एकाच क्लिकमध्ये कोणत्याही आपत्कालीन क्रमांकावर कॉल करता येणार आहे.

सध्या या ॲपवर राज्यातील तब्बल १२,००० हून अधिक बसेसचे लाईव्ह डेटा उपलब्ध आहे. भविष्यात सर्व बसेस या ॲपच्या कार्यकक्षेत येतील. पुढे प्रवाशांच्या अभिप्रायाच्या आधारे ॲपमध्ये आणखी सुधारणा करण्यात येणार आहेत. तसेच लवकरच एसटीचे (MSRTC ) सध्या असलेल्या…तिकिट बुकिंग ॲपमध्येही बसची थेट माहिती (Live Data) समाविष्ट केली जाणार आहे, ज्यामुळे आगाऊ तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनाही मोठी सुविधा मिळेल.

एसटीचा उद्देश प्रवाशांना अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि सुरक्षित सेवा देण्याचा असून, आपली एसटी (Aapli ST) ॲप या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. तसेच महामंडळाने याबाबत प्रवाशांकडून सूचना व अभिप्राय मागवुन , त्यांच्या अपेक्षेनुसार ॲपमध्ये सतत सुधारणा कराव्यात अशी सूचना त्यांनी केली आहे. सध्या हे ॲप MSRTC commuter app या नावाने प्ले स्टोअर मधून प्रवाशांना डाऊनलोड करून घेता येईल.तथापि, आपली एसटी (Aapli ST) हे नाव लवकरच प्ले स्टोअर मध्ये दिसू लागेल.

विजयादशमीच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी…; सराफ बाजारात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी

Web Title: You can the location of your st bus through the st app news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 01:43 PM

Topics:  

  • msrtc
  • st bus

संबंधित बातम्या

Pune MSRTC: पुणे एसटी विभागाला ऑक्टोबर महिन्यात 23 लाखांचे उत्पन्न; ‘ही’ कारणे ठरली फायदेशीर
1

Pune MSRTC: पुणे एसटी विभागाला ऑक्टोबर महिन्यात 23 लाखांचे उत्पन्न; ‘ही’ कारणे ठरली फायदेशीर

एसटीला इलेक्ट्रिक बसेस वेळेवर न पुरवणाऱ्या कंपनीवर राज्य सरकार मेहेरबान, श्रीरंग बरगे यांचा आरोप!
2

एसटीला इलेक्ट्रिक बसेस वेळेवर न पुरवणाऱ्या कंपनीवर राज्य सरकार मेहेरबान, श्रीरंग बरगे यांचा आरोप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.