मुंबई : महाराष्ट्रात प्रस्तावित असणारा वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरात (Gujrat) राज्यात गेल्यामुळं सध्या जनतेमध्ये नाराजीचं वातावरण आहे. यावरुन सध्या राज्यात बरेच आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. तसेच राज्य सरकारच्या (State government) नाकर्तेपणामुळं हा प्रकल्प राज्यातून गुजरातमध्ये (Gujrat) गेल्याचे खापर शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधक फोडत आहेत. (Shinde fadnvis government) दरम्यान, यावरुनच आज राज्यभर युवासेनेतर्फे (Yuvasena) सरकारच्या विरोधात निषेध स्वाक्षरी मोहीम (protest campaign) राबविण्यात आली आहे. मुंबईतील किर्ती कॉलेज येथे युवासेनेने निषेध स्वाक्षरी मोहीम (protest campaign) राबविण्यात आलेय, याला तरुणांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत मोठ्या बॅनरवर तरुणांनी सरकारच्या विरोधात स्वाक्षरी दिल्या.
[read_also content=”शेतकरी पशुपालकांना लंपी रोगविषयी संपर्क साधण्याकरिता मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना https://www.navarashtra.com/maharashtra/establishment-of-ministry-to-contact-farmers-and-animal-326337.html”]
दरम्यान, वेदांत आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प “खोके सरकारच्या” हलगर्जीपणामुळे गुजरातमध्ये गेला, यामुळे १ लाख तरुणांचा रोजगार गेला, याच्या निषेधार्थ आज राज्यभर राज्यातील सर्व जिल्ह्यांत, तालुक्यात, शहरात, मुख्य चौकात युवासेनेतर्फे निषेध स्वाक्षरी मोहीम रबविण्यात आली. या मोहीमेत अधिकाधिक संख्येनं लोकांनी सहभागी व्हावे असं आवाहन युवासेना सचिव वरुण सरदेसाईं (varun sardesai) यांनी केलं होत. त्याला तरुणांनी मोठा पाठिंबा दिल्याचे चित्र आज मुंबईतील किर्ती कॉलेजजवळ पाहयला मिळाले.