Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विठ्ठलनगरीत जिल्हा परिषदेचा दरबार, इतिहासात प्रथमच पंढरपूरातून घेणार आषाढी वारीच्या तयारीचा थेट आढावा

आषाढी वारीपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेने ऐतिहासिक निर्णय घेत पंढरपूरातच बैठक आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सुविधा आणि विकासकामांची पाहणी करणार आहेत.

  • By विवेक
Updated On: Jun 23, 2026 | 08:11 PM
विठ्ठलनगरीत जिल्हा परिषदेचा दरबार, इतिहासात प्रथमच पंढरपूरातून घेणार आषाढी वारीच्या तयारीचा थेट आढावा

विठ्ठलनगरीत जिल्हा परिषदेचा दरबार, इतिहासात प्रथमच पंढरपूरातून घेणार आषाढी वारीच्या तयारीचा थेट आढावा

Follow Us
Follow Us:

पंढरपूर, (वा.) : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून, जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच वारी तयारीची आढावा बैठक थेट विठ्ठलनगरी पंढरपूर येथे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासनाला प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन वारी व्यवस्थापनाचा आढावा घेण्याची संधी मिळणार आहे.

आषाढी एकादशी सोहळ्यासाठी लाखो वारकऱ्यांचे आगमन होण्यापूर्वी पालखी मार्गावरील विकासकामे, मुक्काम व्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि अन्य मूलभूत सुविधांची पाहणी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, विविध विषय समित्यांचे सभापती आणि सदस्य करणार आहेत. त्यानंतर पंढरपूरातच बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील प्रस्ताव जि. प. अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या मंजुरीसाठी पाठविला असून, ही बैठक ३० जून रोजी होण्याची शक्यता आहे. अंतिम निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चार वर्षांच्या प्रशासकीय कारभारानंतर नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील ही पहिली महत्त्वपूर्ण सभा ठरणार आहे. या बैठकीत आषाढी वारीपूर्व तयारीचा सखोल आढावा तसेच विकासकामांचा लेखाजोखा मांडला जाणार आहे.

Vitthal Rukmini Mandir Darshan: विठ्ठल भक्तांसाठी मोठी बातमी! मंदिर समितीकडून महत्त्वाची माहिती जारी

प्रशासनाच्या कार्यपद्धतीतील सकारात्मक बदल

आषाढी वारीसाठी जिल्हा प्रशासन, पोलिस, आरोग्य विभाग आणि विविध शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या असून, पंढरपुरातच जिल्हा परिषदेची बैठक घेण्याचा निर्णय प्रशासनाच्या कार्यपद्धतीतील सकारात्मक बदल मानला जात आहे. पंढरपूर शहरात प्रथमच अशा प्रकारचे आयोजन होत असल्याने या निर्णयाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असून, वारी नियोजनात हा निर्णय मैलाचा दगड ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Ashadhi Ekadashi 2026: विठ्ठलाच्या लेपन प्रक्रियेस स्थगिती! वारकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर देण्यात आला निर्णय

Web Title: Zilla parishad review meeting in pandharpur for ashadhi wari preparation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 08:11 PM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • pandharpur
  • Vitthal Rukmini Mandir

संबंधित बातम्या

विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती संवर्धनाचा मार्ग मोकळा! उच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; रिट याचिका फेटाळली
1

विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती संवर्धनाचा मार्ग मोकळा! उच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; रिट याचिका फेटाळली

Pandharpur History: दक्षिणेची द्वारका म्हणून पंढरपूर का प्रसिद्ध आहे? जाणून घ्या पौराणिक कारणे आणि इतिहास
2

Pandharpur History: दक्षिणेची द्वारका म्हणून पंढरपूर का प्रसिद्ध आहे? जाणून घ्या पौराणिक कारणे आणि इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.