अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखच्या (Genelia Deshmukh) ‘वेड’ (Ved) सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोघांनी ‘तुझे मेरी कसम’ (Tujhe Meri Kasam) या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. आज त्यांच्या या चित्रपटसृष्टीतील प्रवासाला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत.
रितेश-जिनिलियाने वीस वर्षांपूर्वी कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं. आज दिग्दर्शक, निर्माते अशा विविध भूमिका ते निभावत आहेत. एकीकडे रितेश-जिनिलियाच्या सिनेसृष्टीतील प्रवासाला वीस वर्ष पूर्ण होत असताना दुसरीकडे त्यांच्या मुंबई फिल्म कंपनीला 4 जानेवारीला 10 वर्ष पूर्ण होत आहेत.
रितेशने 2003 साली ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने ‘कूल है हम’, ‘ब्लफमास्टर’, ‘हे बेबी’, ‘धमाल’, ‘दे ताली’, ‘हाऊसफुल्ल’, ‘डबल धमाल’, ‘हाऊसफुल्ल 2’, ‘क्या सुपर कूल है हम’, ‘ग्रँड मस्ती’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.
[read_also content=”‘पठाण’च्या रिलीजनंतर ‘डंकी’चा स्टंट करणार शाहरुख खान, पहिल्यांदाच अनुभवणार अंडरवॉटर सीनचा थरार https://www.navarashtra.com/movies/shahrukh-khan-to-work-for-underwater-scene-of-dunki-nrsr-358853.html”]
‘तुझे मेरी कसम’ हा तेलगू चित्रपट ‘नुव्वे कवाली’चा रिमेक होता. जो मल्याळम चित्रपट ‘निरम’चा रिमेक होता.‘तुझे मेरी कसम’ सिनेमाच्या वेळी रितेशचे वडील विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. विलासराव देशमुख यांचा मुलगा चित्रपटसृष्टीत प्रवेश करेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. रितेशने मुंबईच्या कमला रहेजा महाविद्यालयातून आर्किटेक्ट ही पदवी प्राप्त केली. काही दिवस त्याने एका कंपनीमध्ये आर्किटेक्ट म्हणून काम देखील केले. पण अभिनयाचे वेड त्याला मुंबईत घेऊन आले आणि ‘तुझे मेरी कसम’ सिनेमातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
रितेशने 2013 साली ‘बालक-पालक’ या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माता म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर 2014 साली ‘लय भारी’ या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता म्हणून रितेशने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. अनेक लोकप्रिय सिनेमांत पाहुणा कलाकार म्हणूनदेखील तो झळकला आहे.
जिनिलियाबद्दल सांगायचं तर ‘तुझे मेरी कसम’ नंतर तिने हिंदी चित्रपटांसोबतच तमिळ आणि तेलुगू चित्रपटातही तिने काम केलं. ‘बॉईज’, ‘सत्यम’, ‘मस्ती’, ‘साय’, ‘सांबा’, ‘ना अल्लुडू’, ‘सचिन’,‘बोम्मारिल्लू’, ‘चेन्नई कादल’, ‘सुभाषचंद्र बोस’, ‘हॅपी’, ‘राम’, ‘धी’, ‘मि. मेधावी’, ‘सत्या इन लव्ह’, ‘संतोष सुब्रमण्याम’, ‘मेरे बाप पहले आप’, ‘रेडी’, ‘जाने तू या जानेना’, ‘किंग’ इत्यादी चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. ‘वेड’ चित्रपटाच्या माध्यामातून तिने मराठीत पदार्पण केलं आहे. ती या चित्रपटाची निर्माती आहेत. तर ‘वेड’ हा रितेशने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा आहे.