मधुराणी प्रभुलकर सध्या काय करतेय…? दोन शब्दातच दिलं उत्तर
‘आई कुठे काय करते’ मालिकेतून टिव्ही अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर प्रकाशझोतात आली होती. मालिकेमध्ये मधुराणीने अरुंधतीचं पात्र साकारलं होतं. अरुंधती या पात्राने तिला विशेष लोकप्रियता दिली. या मालिकेने मालिकेतल्या सर्वच कलाकारांना स्वत:ची विशेष ओळख दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ५ वर्ष निखळ मनोरंजन करणाऱ्या ह्या मालिकेतल्या कलाकारांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मालिका बंद झाल्यानंतर ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या काय करते ? या प्रश्नाचं उत्तर तिने व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिले आहे.
आशुतोष गोवारीकर यांच्या प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडला २० वर्ष पूर्ण, सोशल मीडियावर शेअर केली झलक!
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने शेअर केलेल्या व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मधुराणी प्रभुलकरने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे, ज्यामध्ये ती झोपाळ्यावर निवांत बसलेली पाहायला मिळत आहे. शेअर केलेल्या रीलला अभिनेत्रीने कॅप्शन दिले की, “मी सध्या काय करतेय…? ‘चिल’टाकतेय.” शेअर केलेल्या रीलला अभिनेत्रीने “आपण आपले संपूर्ण आयुष्य चांगल्या वेळेची वाट पाहण्यात घालवतो, पण सध्याचा जो वेळ आहे तोच चांगला हे कोणाला माहितच नाही. सध्याचा जो वेळ चालला आहे, हाच चांगला वेळ आहे, हे कोणालाच माहिती नाही.” अशा आशयाचा आवाज ऐकू येत आहे. अभिनेत्री अनेक दिवसांनंतर इतकी आरामात बसलेली पाहायला मिळत आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर मधुराणी सध्या आराम करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंट करत प्रेम व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक चाहत्यांनी अभिनेत्रीची ‘आई कुठे काय करते’ मालिका फार मिस करत असल्याचे म्हटले आहे, तर काही जण अरुंधतीला मिस करत असल्याचे म्हणत आहे. मधुराणी प्रभुलकर स्टारर ‘आई कुठे काय करते’ही मालिका स्टार प्रवाहवर २३ डिसेंबर २०१९ पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर मुख्य भूमिकेत होती. मधुराणीने साकारलेले अरुंधती पात्र महाराष्ट्रातल्या घराघरातच नाही तर परदेशातही पोहोचलं. ही मालिका प्रेक्षकांना फारच आवडली टीआरपी रेटिंग चार्टमध्ये मालिका सतत पहिल्या क्रमांकावर राहिली आहे. पाच वर्षे मालिकेने प्रेक्षकांचे फार मनोरंजन केले. मालिकेने ३० नोव्हेंबर २०२४ ला प्रेक्षकांचा निरोप घेतला.
‘पंचायत’च्या दामादजीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न, फोटो शेअर करत म्हणाला…






