Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगदंबा माया आणि महिषासुराच्या कटांना कसं देणार जोरदार प्रत्युत्तर

कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेत प्रेक्षकांना यंदा अनुभवायला मिळणार आहे रंजक घटनांची साखळी. माया निद्रादेवीचे अश्रू जगदंबेच्या अन्नात मिसळवते, जे अश्रू महिषासुराने छळ करून मिळवलेले असतात.

  • By चेतन बोडके
Updated On: Jul 07, 2025 | 05:12 PM
जगदंबा माया आणि महिषासुराच्या कटांना कसं देणार जोरदार प्रत्युत्तर

जगदंबा माया आणि महिषासुराच्या कटांना कसं देणार जोरदार प्रत्युत्तर

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेत प्रेक्षकांना यंदा अनुभवायला मिळणार आहे रंजक घटनांची साखळी. माया निद्रादेवीचे अश्रू जगदंबेच्या अन्नात मिसळवते, जे अश्रू महिषासुराने छळ करून मिळवलेले असतात. दरम्यान, महिषासुर आणि शुक्राचार्य कामनापूर्ती यज्ञ सुरू करतात. या यज्ञातून ब्रम्हदेवांकडून तुळजा प्राप्त करण्याचा त्यांचा कट आहे. पण या सगळ्यात माया आणि महिषासुर यशस्वी होणार का? आणि जगदंबा हा कट कसा परतवणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

‘पंचायत ५’ची घोषणा! फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा; वेबसीरिज केव्हा रिलीज होणार ?

या सगळ्यात जगदंबा मायाच्या अश्रूंचा उलटा वापर करून महिषासुराची तपश्चर्या भंग करते आणि तिचे अपहरण करण्याचा कट उधळून लावते. ब्रह्मदेवही या घटनेने थक्क होतो. महिषासुर निद्रेत असल्याने शुंभा अस्वस्थ होते, तर माया महिषासुराच्या मनात तिच्याविरोधात संशय निर्माण करण्याचे कारस्थान रचते. दुसरीकडे, मायाने झाडरूपात कैद केलेले आणि महादेवांनी मुक्त केलेले जनकबाबा गावात परत येतात, ज्यांच्याकडून देवीबद्दल माहिती मिळवण्यासाठी मनोरमा प्रयत्नशील आहे. सुरवंती आणि माया समोरासमोर येतात. खोट्या सोन्याने फसवणूक केलेल्या मायाचं खरं स्वरूप सुरवंती उघड करणार का, हेही लवकरच स्पष्ट होईल. मायाचा पुढचा डाव असतो – मानवी रूपातील जगदंबेच्या डोक्यावर वार करून तिला निष्प्रभ करणे. मात्र तिचा हा कट फसतो. तरीही विंचूच्या बनावाने ती गंगाईच्या अधिक जवळ जाते.

रिअल तो रिअल होता हैं! नीना गुप्ताने दाखवली ‘लक्ष्या’ने दिलेली ‘ती’ खास भेट, प्रिया बेर्डे झाली भावुक म्हणाली…

महादेव आणि नंदी देवीच्या शोधात एका गावात पोहोचतात, जिथे महादेव म्हाताऱ्याचे रूप घेतात. गावकरी रूपातील माया आपल्या असुररूपातील मनोवृत्तीने अस्वस्थ होते. ती जाणते की जगदंबाला तिच्या आईच्या मायेच्या कवचातून बाहेर काढल्याशिवाय अपहरण शक्य नाही. त्यामुळे मुलांमध्ये भांडण घालून जगदंबेला आपल्या गटात ओढण्याचा नवा डाव ती आखते. या डावात माया आपल्या मायावी शक्तीने एक असुरी “मायावृक्ष” निर्माण करते. या वृक्षाच्या प्रभावामुळे गावातील मुले नाट्यमयरित्या बंदिवान होतात. अशा परिस्थितीत गंगाईने जगदंबाला घराबाहेर पडण्याची मनाई केलेली असताना, ती या मुलांना वाचवण्यासाठी बाहेर पडेल का? की याच संधीचा फायदा घेऊन माया तिचे अपहरण करेल?

या सर्व घडामोडींसह मालिकेतील उत्कंठा शिगेला पोहोचत असून, प्रेक्षकांसमोर येणार आहे नवे संघर्ष, नवे चढउतार… जगदंबा कसे देणार माया आणि महिषासुराच्या कटांना जोरदार प्रतिउत्तर जाणून घेण्यासाठी नक्की बघा आई तुळजाभवानी दररोज रात्री ९ वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Web Title: Aai tuljabhavani serial jagdamb maya and mahishasur altercation see latest episode update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 05:12 PM

Topics:  

  • colrs marathi serials
  • marathi serial news
  • marathi serial update
  • tv serial

संबंधित बातम्या

अखेर थाटात पार पडणार तेजा- वैदहीचा विवाह सोहळा, ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ मालिकेचा पाहा विशेष भाग
1

अखेर थाटात पार पडणार तेजा- वैदहीचा विवाह सोहळा, ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ मालिकेचा पाहा विशेष भाग

‘वीण दोघातली ही तुटेना’ मध्ये स्वानंदी–समरचा नवा संघर्ष! रोहन-अधिराच्या नात्याचं काय होणार
2

‘वीण दोघातली ही तुटेना’ मध्ये स्वानंदी–समरचा नवा संघर्ष! रोहन-अधिराच्या नात्याचं काय होणार

आदिनाथ झाला लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक! आगामी मालिकेसाठी केली प्रार्थना
3

आदिनाथ झाला लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक! आगामी मालिकेसाठी केली प्रार्थना

‘ठरलं तर मग’चे 900 भाग पूर्ण, पूर्णा आजीच्या आठवणीने जुई गडकरी भावूक, म्हणाली आजीच्या नावाने….
4

‘ठरलं तर मग’चे 900 भाग पूर्ण, पूर्णा आजीच्या आठवणीने जुई गडकरी भावूक, म्हणाली आजीच्या नावाने….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.