Panchayat Season 5 Release Announced In 2026 Prime Video Teases New Poster Out
काही दिवसांपूर्वीच ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवरील ‘पंचायत ४’ ही लोकप्रिय वेबसीरीज रिलीज झाली. या वेबसीरीजने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. ‘पंचायत’ वेबसीरीजच्या चारही सीझनचे प्रेक्षकांकडून कौतुक झाल्यानंतर आता चाहत्यांना वेबसीरीजच्या आगामी सीझनची निर्मात्यांनी हिंट दिलेली आहे. ‘पंचायत ५’ची काही तासांपूर्वीच आता निर्मात्यांनी हिंट दिलेली आहे. ॲमेझॉन प्राईम व्हिडिओकडून काही तासांपूर्वीच ‘पंचायत ५’ वेबसीरिजचं अधिकृत पोस्टर शेअर करण्यात आले आहे. शिवाय, निर्मात्यांनी वेबसीरीजच्या रिलीज डेटचाही खुलासा केला आहे.
‘पंचायत ५’ ही वेबसीरीज पुढच्या वर्षी प्रदर्शित करण्यात येणार आहे. वेबसीरीजच्या शुटिंगबद्दल अद्याप खुलासा झालेला नाही. सध्या चाहते, ‘पंचायत ५’साठी कमालीचे आतुर आहेत. निर्मात्यांनी ‘पंचायत ५’ची घोषणा करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “हाय 5 फुलेरामध्ये पुन्हा येण्याची तयारी सुरु करा…” ‘पंचायत ५’ वेबसीरिजची घोषणा करताना ॲमेझॉन प्राईम व्हिडिओने वेबसीरिजच्या पुढील सीझनचं अधिकृत पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये ‘पंचायत’ वेबसीरिजची गँग पुन्हा दिसत आहे. विशेष गोष्ट म्हणजे पोस्टरमध्ये बिनोदला सर्वांनी उचलून घेतलेलं दिसत आहे. पोस्टरमध्ये सर्व त्याच्याकडे कौतुकाने बघत आहेत.
Hanumankind करणार रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटामधून डेब्यू, कोण आहे हा प्रसिद्ध रॅपर?
बिनोद सुद्धा आनंदात जल्लोष करताना दिसत आहे. प्रधानजी आणि मंजू देवी यांच्या हातात लौकी (दुधी) दिसत आहे. अशाप्रकारे वेबसीरिजच्या पोस्टरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. ‘पंचायत ५’मध्ये सचिव- रिंकूचं लग्न होणार का ? ‘फुलेरा’ गावचा नवा प्रधानजी (सरपंच) कोण होणार? विधायकीच्या (आमदार) निवडणूकीत प्रल्हाद उभा राहणार का ? यांसह अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहे. ‘पंचायत ५’ पुढील वर्षी अर्थात २०२६ साली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.