‘कटपुतली’ हा 2018 च्या तमिळ सायकोलॉजिकल क्राइम थ्रिलर ‘रत्सन’ चा अधिकृत रिमेक आहे, ज्यात विष्णू विशाल आणि अमाला पॉल यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या.
या चित्रपटात अक्षय पुन्हा एकदा पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. यावेळी तो हत्येचे गूढ उकलत सीरियल किलरला पकडताना दिसणार आहे.
हा चित्रपट 2 सप्टेंबर रोजी OTT वर प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
‘मिशन सिंड्रेला’ या चित्रपटाचे नाव बदलून ‘कटपुतली’ करण्यात आले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्याच्या कथेची आणि कथानकाची कल्पना येते.