Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ZEE5 वरील ‘अंधा प्यार 2.0’ मध्ये झळकलेला Pawan Choure ‘पिक्चर बॉईज’ मधून थिएटरमध्ये झळकणार!

अभिनेता पवन चौरे आता झळकणार पिक्चर बॉईजमध्ये. खेड्यातून येऊन हिरो होण्याचे स्वप्न त्याने पूर्ण केले आहे आणि आता थिएटरमध्ये त्याचा चित्रपट येणार आहे. चिकाटीच्या जोरावर पवनचे स्वप्नं झाले पूर्ण

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 14, 2026 | 11:40 AM
जिद्दीने अभिनेता होण्याचे स्वप्नं केले पवनने पूर्ण

जिद्दीने अभिनेता होण्याचे स्वप्नं केले पवनने पूर्ण

Follow Us
Follow Us:
  • अभिनेता पवन चौरेची मोठी झेप
  • ‘पिक्चर बॉईज’ मध्ये झळकणार
  • रुपेरी पडद्यावर काम करण्यास सज्ज 
अभिनय क्षेत्रात हिरो होण्याचं स्वप्न हे प्रत्येकाचं असत. परंतु प्रत्येकालाच हे स्वप्न पूर्ण करता येईल हे अजिबात सांगता येत नाही. एका खेड्यातून येऊन मेहनत, जिद्द  आणि चिकाटीच्या जोरावर एका तरुणाने त्याचे स्वप्न हे प्रत्यक्षात उतरवले आहे. ‘ZEE5 वरील अंधा प्यार 2.0’ या वेबसिरीज मधून घराघरात पोहचलेला अभिनेता पवन चौरे आता रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाला आहे. येत्या १५ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या “पिक्चर बॉईज’ या चित्रपटात आपल्याला त्याची महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे.

त्रिमूर्ती फिल्म्सनं ‘पिक्चर बॉईज’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रवी पांडुरंग पंडितपवार, राजा पांडुरंग पंडितपवार हे या चित्रपटाचे निर्माते असून शिवाजी केशव पाटील हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन निलेशसिंह राजपूत यांनी केलं आहे.

‘रूबाब’ आता मराठी ZEE5 वर पहा, काय आहेत 5 खास कारणं; ड्रामा, भावना, कथा सर्वच एका क्लिकवर

काय म्हणाला पवन?

इतकी मोठी झेप घेताना पवन म्हणाला की, ‘एका खेड्यातून आलेल्या तरुणासाठी हा प्रवास खूप अभिमानास्पद आहे. माझ्या कुटुंबाचा, मित्रांचा आणि प्रेक्षकांचा पाठिंबा नसता तर हे शक्य झालं नसतं. मला माझं नाव खूप मोठं करायचं आहे. म्हणतात ना, स्वप्नं पाहिली की ती नक्की पूर्ण होतात आणि मी माझी स्वप्नं नक्की पूर्ण करणार.’ आगामी काळातही प्रेक्षकांचे असेच प्रेम आणि आशीर्वाद मिळत राहतील, अशी अपेक्षा असल्याचे अभिनेता पवन याने सांगितले.

अभिनयाबरोबरच मी कलरीपयट्टू, जिम्नॅस्टिक्स आणि कुस्ती यांसारख्या कलादेखील शिकत आहे. या नव्या गोष्टी स्वतःमध्ये आत्मसात करताना मला खूप अभिमान वाटतो आणि त्याचा मला माझ्या कामातही फायदा होत आहे असे त्याने आवर्जून सांगितले.

कसा आहे पवनचा प्रवास 

पवनचा प्रवास हा खेड्यापासून सुरु झाला असला तरीही प्रत्येक स्वप्नं पाहणाऱ्यांसाठी नक्कीच आदर्शवत आहे. स्वप्नं मोठी असली तरीही ती पूर्ण करण्याची जिद्द आणि चिकाटी पाहिजे. असं असल्याशिवाय काम पूर्ण होत नाही हेच पवन चौरेच्या या प्रवासाने दाखवून दिले आहे. पवनकडे पाहून अन्य खेड्यातील कलाकारही आपली स्वप्नं नक्कीच पूर्ण करू शकतील असा विश्वास त्याने इतरांना दिला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

अभिनेता Bhushan Pradhan लवकरच अडकणार लग्नबंधनात; फोटो शेअर करत जाहीर केली लग्नाची तारीख, पाहा Photo

Web Title: Actor pawan choure to act in picture boys after andha pyar 2 0

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Entertainment News
  • marathi movie
  • Marathi Movie News

संबंधित बातम्या

The India Story हे असंच सुरू राहिलं तर आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही -श्रेयस तळपदे
1

The India Story हे असंच सुरू राहिलं तर आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही -श्रेयस तळपदे

Bhootam Bhayyam Movie: ‘भूतम भयम्’ मधील भूमिकेसाठी करण सोनावणेने गिरवले मालवणीचे धडे; प्रेक्षकांना दिसणार नवा अंदाज
2

Bhootam Bhayyam Movie: ‘भूतम भयम्’ मधील भूमिकेसाठी करण सोनावणेने गिरवले मालवणीचे धडे; प्रेक्षकांना दिसणार नवा अंदाज

दत्तभक्तीचा सुरेल सोहळा! १२ वर्षांनंतर पं. अजित कडकडे यांचं पुनरागमन; ‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ भक्तिगीत प्रदर्शित
3

दत्तभक्तीचा सुरेल सोहळा! १२ वर्षांनंतर पं. अजित कडकडे यांचं पुनरागमन; ‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ भक्तिगीत प्रदर्शित

Samarth Teaser Out: समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आधुनिक स्पर्श; ‘समर्थ’ चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित
4

Samarth Teaser Out: समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आधुनिक स्पर्श; ‘समर्थ’ चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.