Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर, ‘आलेच मी’ शानदार लावणी रिलीज

मराठी चित्रपटसृष्टीत आता उत्साह आणि सौंदर्याची लाट उसळणार आहे, कारण सगळ्यांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर 'देवमाणूस' या बहुप्रतिक्षित चित्रपटात 'आलेच मी' म्हणत पहिल्यांदाच शानदार लावणीवर थिरकणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 15, 2025 | 02:17 PM
सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर, 'आलेच मी' शानदार लावणी रिलीज

सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर, 'आलेच मी' शानदार लावणी रिलीज

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत आता उत्साह आणि सौंदर्याची लाट उसळणार आहे, कारण सगळ्यांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ‘देवमाणूस’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात ‘आलेच मी’ म्हणत पहिल्यांदाच शानदार लावणीवर थिरकणार आहे. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लव फिल्म्सच्या लव रंजन आणि अंकुर गर्ग यांची निर्मिती असलेला आणि तेजस देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘करुन टाका भावना- सिद्धूचं लग्न…’, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतला हटके ट्वीस्ट पाहून चाहतेही खूश

विविधांगी भूमिका साकारून आपली छाप पाडणारी सई, ‘आलेच मी’ या गाण्यातून एका वेगळ्याच अविष्कारात प्रेक्षकांसमोर येत आहे. पारंपरिक मराठी संगीतसृष्टीत आपली खास ओळख असणाऱ्या बेला शेंडे यांच्या दमदार आवाजात हे गीत साकारण्यात आले असून रोहन प्रधान यांनी त्यांना साथ दिली आहे. रोहन-रोहन यांचे संगीत लाभलेले हे गाणे तेजस देऊस्कर यांनी लिहिले असून रोहन गोखले यांनीही अतिरिक्त गीतलेखन केले आहे. सुप्रसिद्ध लावणी तज्ज्ञ आशीष पाटील यांनी या गाण्याची नृत्यरचना केली आहे, जी अत्यंत जोशपूर्ण आणि सुरेख आहे.

या भूमिकेसाठी सईने तब्बल ३३ तासांपेक्षा अधिक वेळ सरावाला दिला, लावणीच्या प्रत्येक नजाकतीत ती पूर्णपणे रमली आणि एक धमाकेदार परफॉर्मन्स तिने सादर केला आहे. आपल्या अनुभवाबद्दल सई म्हणते, “’देवमाणूस’मध्ये लावणी करणे हा एक विलक्षण अनुभव होता. हा माझा एक नवीन प्रयत्न होता आणि मला खूप मजा आली. गाणे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन हलली. लव फिल्म्स आणि तेजस यांनी मला या भूमिकेसाठी निवडले, याबद्दल मी खूप आभारी आहे. आशीषच्या मार्गदर्शनाशिवाय इतकी प्रभावी लावणी साकारता आलीच नसती. प्रेक्षकांना माझे हे नवे रूप आवडेल, अशी आशा आहे!”

आयुष्याला नव्याने सामोरे जाण्याची प्रेरणा देणाऱ्या ‘आता थांबायचं नाय’चा ट्रेलर प्रदर्शित

‘आलेच मी’ हे गाणे त्याच्या भन्नाट बीट्स, आकर्षक सादरीकरण आणि सईच्या जबरदस्त उपस्थितीमुळे लवकरच टॉप लिस्टमध्ये झळकण्यास सज्ज आहे.

लव फिल्म्स प्रस्तुत, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर गर्ग निर्मित देवमाणूस २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Happy Birthday Mandira Bedi: डीडी नॅशनलची ‘शांती’ ते क्रिकेटची स्टार ‘अँकर’; मंदिरा बेदीची कशी आहे फिल्मी करियर

Web Title: Actress sai tamhankar perform devmanus marathi movie aalech me song in lavni see video song

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 02:17 PM

Topics:  

  • marathi actress
  • marathi movie
  • Sai Tamhankar

संबंधित बातम्या

‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचा भव्य ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न!
1

‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचा भव्य ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न!

रणपती शिवराय चित्रपटातून चिन्मय मांडलेकरची एक्झिट! ‘या’ कारणामुळे शिवरायांची भूमिका करण्यास दिला नकार
2

रणपती शिवराय चित्रपटातून चिन्मय मांडलेकरची एक्झिट! ‘या’ कारणामुळे शिवरायांची भूमिका करण्यास दिला नकार

सुपारी फुटली! अभिनेत्री गायत्री दातार लवकरच अडकणार लग्नबंधनात, खास व्हिडिओ केला शेअर
3

सुपारी फुटली! अभिनेत्री गायत्री दातार लवकरच अडकणार लग्नबंधनात, खास व्हिडिओ केला शेअर

‘केस नं. ७३’ मुखवट्यामागील गडद रहस्य येणार प्रेक्षकांच्या समोर, वकील बनून सत्यासाठी लढणार ‘ही’ अभिनेत्री
4

‘केस नं. ७३’ मुखवट्यामागील गडद रहस्य येणार प्रेक्षकांच्या समोर, वकील बनून सत्यासाठी लढणार ‘ही’ अभिनेत्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.