Happy Birthday Mandira Bedi
यशस्वी मॉडेल, फॅशन डिझायनर आणि टिव्ही प्रेझेंटर म्हणून आपली ओळख प्रस्थापित केलेल्या मंदिरा बेदीचा आज वाढदिवस आहे. या शिवाय मंदिरा बेदी एक प्रसिद्ध अभिनेत्रीही आहे. तिला सर्वाधिक प्रसिद्धी ९० च्या दशकातील ‘शांती’ या टिव्ही शोच्या माध्यमातून मिळाली. या शोच्या माध्यमातून तिने घराघरांत आपला ठसा उमटवला. मंदिरा बेदीचा जन्म १५ एप्रिल १९७२ रोजी कोलकात्यात झाला. आज ती तिचा ५३ वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. मंदिरा आपल्या दोन्हीही मुलांचा सांभाळ एकटीच करतेय. पतीच्या निधनानंतर ती सिंगल मदर म्हणून आपल्या मुलांचा सांभाळ करतेय.
१९९४मध्ये डीडी नॅशनलची प्रसिद्ध मालिका ‘शांती’मधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या मंदिराने आयपीएलच्या सीझन २ मध्ये अँकर म्हणून प्रसिद्धी मिळवली होती. मंदिरा बेदीने १९९५मध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिला त्याचा फारसा फायदा झाला नाही. दोन दशकांहून अधिकच्या फिल्मी करियरमध्ये मंदिराने २ तमिळ भाषेतील चित्रपटांसह एकूण १३ चित्रपट केले. अभिनयासोबतच मंदिराने होस्टिंगमध्येही नशीब आजमावले. तिने २००३ ते २००७मध्ये आयसीसी विश्वचषक, २००४ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, २००६ मध्ये सोनी मॅक्ससाठी आयपीएल-२चे अँकरिंग तिने केली होती.
भावाच्या आठवणीत अपूर्वा नेमळेकरची भावूक पोस्ट; म्हणाली, ‘कदाचित, मी तो दिवस बदलू शकले असते तर…’
क्रिकेट अँकारिंग दरम्यान मंदिरा नेसत असलेल्या साड्या कमालीच्या चर्चेत आल्या होत्या. त्या काळात तिने नेसलेल्या साड्यांचा ट्रेंड कमालीचा चर्चेत आला होता. त्यानंतर तिने २०१४ मध्ये स्वतःच्या साड्यांचा ब्रँडही सुरू केला. तिने १४ फेब्रुवारी १९९९ रोजी मंदिराने चित्रपट निर्माता राज कौशलशी लग्न केले. गेल्या काही वर्षांपूर्वीच राज कौशलचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मंदिरा आणि राजला एक मुलगा असून त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली आहे. पतीच्या निधनानंतर मंदिरा दोन्हीही मुलांचा ‘सिंगल मदर’ म्हणून सांभाळ करतेय. अभिनय आणि होस्टिंगमध्ये आपला ठसा उमटवणारी मंदिरा बेदी तिच्या फिटनेसबाबतही खूप जागरूक आहे. वयाच्या ५३ व्या वर्षीही ही अभिनेत्री चिरतरुण दिसतेय.