Lakshmi Niwas Filmy Twist Siddhu Accidentally Falls Kumkum On Bhavana Watch Promo
झी मराठीवरील ‘लक्ष्मी निवास’ मालिका सध्या सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेमध्ये प्रेक्षकांना वेगवेगळे ट्वीस्ट अनुभवायला मिळत आहे. आता अशातच प्रेक्षकांच्या भेटीला मालिकेत एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. मालिकेमध्ये नुकताच सिद्धूचा त्याच्या मनाविरुद्ध साखरपुडा पार पडला. त्याचं प्रेम असणाऱ्या व्यक्तीसोबत साखरपुडा न होत असल्यामुळे तो सध्या नाराज असल्याचं दिसत आहे. सिद्धूचं भावनावर जिवापाड प्रेम आहे, पण भावना त्याला जास्त भाव देत नसते. पण आता या दोघांमध्ये एक वेगळाच ट्वीस्ट आलेला पाहायला मिळत आहे. या ट्वीस्टची आता चांगलीच चर्चा होत आहे.
आयुष्याला नव्याने सामोरे जाण्याची प्रेरणा देणाऱ्या ‘आता थांबायचं नाय’चा ट्रेलर प्रदर्शित
दरम्यान, सिद्धूचा नुकताच पूर्वीसोबत साखरपुडा झाला आहे. आपल्या आवडत्या जीवनसाथीसोबत साखरपुडा न झाल्यामुळे सिद्धू खूपच नाराज आहे. पहिल्याच नजरेत मनामध्ये बसलेल्या भावनावर सिद्धू जीवापाड प्रेम करतो. तो तिच्यासोबतच लग्न करण्यास ठाम असतो. पण पुढे काही कारणास्तव, त्याच्या वडिलांची राजकीय मैत्री टिकवण्यासाठी सिद्धूचं आणि पूर्वीचं लग्न ठरवलं जातं. त्याच्या नकळत पूर्वीसोबत त्याचा साखरपुडा केला जातो. आता लग्नाच्या आधीच्या विधींदरम्यान एक नवा ट्वीस्ट आला आहे. काही तासांपूर्वीच झी मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर मालिकेचा अपकमिंग एपिसोडचा प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे. प्रोमोने आता सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, लग्नाच्या आधीच्या विधींना सुरू होत असताना मालिकेत एक नवीन द्विस्ट येणार आहे. यावेळी भावना पूर्वीला हळदी-कुंकू लावण्यासाठी पुढे जाते. यावेळी भावना हळदी-कुंकू लावण्यासाठी जातेय हे पाहून सिद्धूची आजी प्रचंड भडकते. रागाच्या भरात आजी भावनाला म्हणतात, “अगं ए… बाजूला हो… लग्नाच्याच दिवशीच स्वतःच्या नवऱ्याला गिळून बसलीस. आता आमच्या घरात येऊन कुंकवाला हात लावतेस. अगं सौभाग्याचं लेणं आहे ते… तुझ्यासाठी नाहीये…” आजीकडून भावनाचा झालेला अपमान सिद्धूला सहन होत नाही, तो लगेच उठून आजीला प्रत्युत्तर देत म्हणतो, “बस्स झालं… तुझ्या या जुनाट कल्पना तुझ्यापाशीच ठेव. आमच्यावर लादू नकोस. इथे जमलेल्या सगळ्या बायकांपेक्षा भावना मॅडम ग्रेट आहेत.”
नाट्यरसिकांसाठी नाटकांची मेजवानी, वेगवेगळ्या धाटणीची नाटकं येणार प्रेक्षकांच्या भेटीला…
सिद्धूचं आणि त्याच्या आजीचं भांडण शांत झाल्यानंतर सिद्धूच्या आईने त्याला “हे कुंकू देवीसमोर ठेव आणि पूर्वीच्या कपाळाला लाव” असं सांगते. पण, इतक्यात त्याचा तोल जातो आणि ताट हातातून निसटतं. ताट एकीकडे आणि त्यातील कुंकू एकीकडे उडतं. ते सगळं कुंकू असं उडतं की, ते थेट भावनाच्या कपाळावरंच कुंकू पडतं. यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. आता सिद्धूच्या हातून नकळत घडलेल्या या घटनेचे पुढे जाऊन काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, या नव्या ट्वीस्टमुळे सगळेच अचंबित झालेले आहेत. दरम्यान, हा प्रोमो पाहून नेटकरी चांगलेच खुश झाले आहेत. लवकरात लवकर सिद्धूचं आणि भावनाचं लग्न व्हावं, अशी नेटकऱ्यांची इच्छा आहे. येत्या १७ एप्रिलला रात्री ८ वाजता हा एपिसोड टेलिकास्ट केला जाणार आहे.