Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेत्री तेजस्वीनी लोणारीचा अनोखा उपक्रम ‘टेम्पल ट्रेल्स’! मनोरंजनाचे नवे माध्यम

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने “तेजक्राफ्ट” या निर्मिती संस्थेतून यूट्यूब चॅनल सुरू करून “Temple Trails with Tejaswini” या मालिकेद्वारे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची सफर प्रेक्षकांसमोर आणली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 22, 2025 | 02:56 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

हल्ली कलाकार केवळ अभिनयापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर त्यापलीकडे जाऊन अनेक क्षेत्रांत आपले वेगळेपण सिद्ध करताना दिसतात. कोणी व्यवसायात उतरले, तर कोणी स्वतःच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्रेक्षकांशी थेट संवाद साधताना दिसतात. अशाच वेगळ्या पावलाचं उदाहरण अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने घातलं आहे. अभिनयाच्या जोडीला ती आता एका नव्या प्रवासाला निघाली असून स्वतःच्या निर्मिती संस्थेतून “तेजक्राफ्ट” या बॅनरखाली स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. या चॅनलवरील पहिली मालिकाच प्रेक्षकांसाठी खास ठरली आहे: “Temple Trails with Tejaswini”.

सलमान खानने लडाखमध्ये सुरु केले ‘Battle of Galwan’चे शूटिंग, BTS फोटोने वाढली उत्सुकता

या मालिकेच्या नावावरूनच प्रेक्षकांना कल्पना येते की यात मंदिरे, परंपरा आणि संस्कृती यांचा आढावा असणार आहे. मात्र ही फक्त धार्मिक स्थळांची सफर नाही, तर आपल्या महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाची एक आध्यात्मिक यात्रा आहे. तेजस्विनी या मालिकेतून महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण मंदिरांचा इतिहास, त्यामागची श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक महत्त्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहे.

तेजस्विनी सांगते,  “हे फक्त मंदिरे दाखवण्याचं किंवा प्रवास सांगण्याचं माध्यम नाही. हा आपल्या परंपरेच्या मूळाशी जाण्याचा, श्रद्धा आणि इतिहास एकत्र अनुभवण्याचा प्रयत्न आहे. मला वाटतं, प्रत्येक मंदिराच्या भिंती एक कथा सांगतात आणि ती कथा प्रेक्षकांपर्यंत पोहचवणं हेच या मालिकेचं खरं उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रात अनेक सुंदर मंदिर धार्मिक स्थळ आहेत आणि त्याचा मागची गोष्ट यातून मला प्रेक्षकांना सांगायची आहे म्हणून ही सीरिज करू या असं ठरवलं”

हर्षवर्धन राणेच्या ‘Ek Deewane Ki Deewaniyat’ चित्रपटाचा टीझर रिलीज, दिसणार एक अनोखी लव्हस्टोरी


मालिका, चित्रपट आणि रिअ‍ॅलिटी शोजमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी तेजस्विनी, आता या नव्या प्रयोगातून पुन्हा एकदा चाहत्यांसमोर वेगळ्या भूमिकेत दिसते आहे. अभिनयासोबतच ती प्रेक्षकांना महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. त्यामुळे “Temple Trails with Tejaswini” ही सीरिज केवळ मनोरंजन नव्हे, तर अध्यात्मिक अनुभव देणारी ठरणार आहे यात शंका नाही.

Web Title: Actress tejaswi lonaris unique initiative temple trails

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 02:55 PM

Topics:  

  • marathi actress
  • Tejswini Pandit
  • YouTube

संबंधित बातम्या

Filmfare 2025: फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये मराठमोळ्या छाया कदम यांचा डंका, ‘लापता लेडीज’साठी फिल्मफेअर पुरस्काराने गौरव
1

Filmfare 2025: फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये मराठमोळ्या छाया कदम यांचा डंका, ‘लापता लेडीज’साठी फिल्मफेअर पुरस्काराने गौरव

प्रथा- हँडलूम साड्यांचा नवा अध्याय, सेलिब्रिटींच्या उपस्थितीत उत्साहात उद्घाटन
2

प्रथा- हँडलूम साड्यांचा नवा अध्याय, सेलिब्रिटींच्या उपस्थितीत उत्साहात उद्घाटन

ती परत आलीये! ३० वर्षांनंतर ‘दामिनी 2.0’ पुन्हा सह्याद्रीवर झळकणार
3

ती परत आलीये! ३० वर्षांनंतर ‘दामिनी 2.0’ पुन्हा सह्याद्रीवर झळकणार

‘झी मराठी अवॉर्ड्स 2025’ ला भावनांचा महाउत्सव; लाडक्या जोड्यांचे मनमोहक परफॉर्मन्स!
4

‘झी मराठी अवॉर्ड्स 2025’ ला भावनांचा महाउत्सव; लाडक्या जोड्यांचे मनमोहक परफॉर्मन्स!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.