अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआरच्या (Jr. NTR) ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर चाहते RRR चित्रपटाचे रिव्ह्यू देत आहेत. प्रत्येक व्यक्ती त्याला RRR चित्रपटातलं सगळ्यात जास्त काय आवडल्याचं सांगत आहे. RRR चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी थिएटरमध्येच नाचत गाजत चित्रपट पाहिला त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Fans vandalised theatre’s infrastructure in Vijayawada after #RRR show stopped screening due to some technical problem. Local police reached the spot and took the situation into control. #RRRMovie pic.twitter.com/yPKM6Clk9L
— Sowmith Yakkati (@sowmith7) March 25, 2022
आलिया भट्ट, ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि अजय देवगण हे सोशल मीडियावर आरआरआर या हॅशटॅगसोबत ट्रेंड करत आहेत. अनेक चाहत्यांनी RRR हॅशटॅगसोबत चित्रपटाबद्दल ट्विट केले आहे. एका नेटकऱ्याने RRR च्या थिएटरमधील एक क्लिप शेअर केली आहे. या क्लिपमध्ये, प्रेक्षक चित्रपटाचा खूप आनंद घेताना दिसत आहेत, तर काही चित्रपटगृहात चित्रपट पाहिल्यानंतर नाचू लागतात. तर एका व्हिडिओत थिएटरची तोडफोड केली जात असल्याचे दिसत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे RRR हा चित्रपट संपूर्ण दाखवता आला नाही. तर चित्रपट बघता न आल्याने चाहत्यांनी संतप्त होऊन तोडफोड केली.
[read_also content=”आजपासून आयपीएलचा महाधमाका, चैन्नई आणि कोलकाता यांच्यात होणार भिडत, धोनी कॅप्टन्सीविना दिसणार ग्राऊंडमध्ये https://www.navarashtra.com/sports/ipl-2022-starts-today-with-10-teams-playing-kolkata-and-chennai-face-off-in-the-first-match-nrps-259891/”]
एसएस राजामौलीच्या ‘आरआरआर’बद्दल अपेक्षा आहे की हा चित्रपट कमाईचे नवे विक्रम करू शकतो. या चित्रपटाने थिएटर राइट्समधूनही करोडोंची कमाई केल्याचे म्हटले जातं आहे.