Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाणच्या घराची केली पाहणी; म्हणाले, “कुठेही कसूर राहता कामा नये…”

नुकतंच अजित पवार यांनी सूरज चव्हाणच्या घराच्या बांधकामाची पाहणी केली आहे. यासंबंधित त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 13, 2025 | 04:31 PM
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाणच्या घराची केली पाहणी; म्हणाले, "कुठेही कसूर राहता कामा नये…"

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाणच्या घराची केली पाहणी; म्हणाले, "कुठेही कसूर राहता कामा नये…"

Follow Us
Close
Follow Us:

सध्या सोशल मीडिया एन्फ्लूएंसर सूरज चव्हाण कमालीचा चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी ५’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरल्यानंतर सूरजला महाराष्ट्रातल्या घराघरात प्रसिद्धी मिळाली. त्याने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरल्यानंतर त्याला पहिला चित्रपट मिळाला, उपमुख्यमंत्र्यांकडून घर देखील मिळालं. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: सूरजची भेट घेतली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला घर बांधून देण्याचे आदेश ही दिले होते. घराचे भूमिपूजन पार पडल्यानंतर सूरजने उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले होते. आता त्यानंतर अजित पवार यांनी सूरज चव्हाणच्या घराच्या बांधकामाची पाहणी केली आहे. यासंबंधित त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

‘फुले’ चित्रपटाच्या ट्रेलरवरून सुरू असलेल्या वादावर अभिनेता प्रतीक गांधीची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला खूप दु:ख झालं…’

अजित पवार यांनी सूरजला घर बांधून देण्याचे जाहीर केले होते. त्यावेळी सूरजने, दादांनी गरिबाच्या पोराला मदत केली, घराचं स्वप्न पूर्ण केलं. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया सूरजने दिली होती. आता त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी सूरज चव्हाणच्या घराची पाहणी केली. यावेळी त्यांनी कामामध्ये कुठेही कसूर राहता कामा नये, कामाची गुणवत्ता चांगलीच असली पाहिजे, असंही बांधकाम व्यावसायिकाला त्यांनी सांगितलं.

६० वर्षीय आमिर खानने धरला नव्या प्रियेसीचा हात; कोण आहे गौरी स्प्रेट? Video Viral

अजित पवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहिले की, “बिग बॉस मराठीचा विजेता, बारामतीचा सुपुत्र सूरज चव्हाणच्या नवीन घराच्या चालू बांधकामाची पाहणी केली. कामात कुठेही कसूर राहता कामा नये, कामाची गुणवत्ता चांगलीच असली पाहिजे, अशा सूचना संबंधितांना दिल्या.” या पोस्टमध्ये काही फोटोदेखील पाहायला मिळत आहेत. या फोटोंमध्ये अजित पवार घराच्या बांधकामाची पाहणी करताना दिसत आहेत. तसेच काही फोटोंमध्ये ते उपस्थितांशी संवाद साधत असल्याचे दिसत आहे.

 

बिग बॉस मराठीचा विजेता, बारामतीचा सुपुत्र सुरज चव्हाणच्या नवीन घराच्या चालू बांधकामाची पाहणी केली. कामात कुठेही कसूर राहता कामा नये, कामाची गुणवत्ता चांगलीच असली पाहिजे, अशा सूचना संबंधितांना दिल्या. 📍बारामती pic.twitter.com/GlFDQoqBCj — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 13, 2025

गेल्या काही दिवसांपासून सूरज चव्हाण त्याच्या पहिल्या वहिल्या चित्रपटामुळे मोठ्या चर्चेत आहे. येत्या २५ एप्रिलला ‘झापूक झुपूक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटात सूरज चव्हाण एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित चित्रपटात सूरज चव्हाणसह पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी, जुई भागवत हे कलाकारदेखील मुख्य भूमिकांत दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी ५’ मध्ये जसे सूरजला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले, त्याप्रमाणेच त्याच्या या नवीन चित्रपटाला प्रतिसाद मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Hit 3 Trailer: नानीच्या क्राइम थ्रिलर चित्रपट ‘हिट ३’ च्या ट्रेलरबाबत समोर आले अपडेट, कधी होणार प्रदर्शित?

Web Title: Ajit pawar inspected the construction of suraj chavans house says the quality of work should be good

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 04:31 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Deputy CM Ajit Pawar
  • marathi actor
  • suraj chavan
  • Television Shows

संबंधित बातम्या

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’
1

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ
2

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाली अन्…; राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये एकच खळबळ
3

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाली अन्…; राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये एकच खळबळ

‘बिग बॉस’ विजेता सुरज चव्हाणने लग्नाआधी केला नवीन घरात गृहप्रवेश, आकर्षक इंटिरियर पाहून चमकतील डोळे
4

‘बिग बॉस’ विजेता सुरज चव्हाणने लग्नाआधी केला नवीन घरात गृहप्रवेश, आकर्षक इंटिरियर पाहून चमकतील डोळे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.