सौजन्य - नवराष्ट्र टीम
निवेदनात म्हटले आहे, दौंड नगरपरिषदेच्या आरोग्य विभागासाठी शहरातील सांडपाणी वाहिन्यांची स्वच्छता, तुंबलेल्या ड्रेनेज लाईन मोकळ्या करणे तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या ड्रेनेजच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी नवीन सक्शन कम जेटिंग मशीन लाखो रुपये खर्च करून खरेदी करण्यात आली आहे. मात्र, ही मशीन सध्या वॉटर ट्रीटमेंट प्लांट परिसरात धूळखात का पडून असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
शहरातील ड्रेनेज लाईन तुंबणे, सांडपाण्याचा निचरा न होणे, अस्वच्छता आणि दुर्गंधी अशा समस्या वारंवार निर्माण होत असताना ही अत्याधुनिक मशीन प्रत्यक्ष कामासाठी वापरात का आणली जात नाही, असा सवाल नागरिक विचारत आहेत. नगरपरिषदेने कररुपाने जमा होणाऱ्या पैशातून लाखो रुपये खर्च करून मशीन खरेदी केली असेल, तर तिचा उपयोग शहराच्या स्वच्छतेसाठी होणे अपेक्षित आहे. मात्र, मशीन वापराविना पडून असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या मशीनसाठी चालक, ऑपरेटर तसेच आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती कधी करणार? मशीनच्या वापराबाबत नियोजन सहा महिने उलटून गेले तरी का केले नाही? तसेच मशीन कार्यान्वित न होण्यामागील नेमकी कारणे काय आहेत? असे प्रश्न नगरसेविका सावंत यांनी उपस्थित केले आहेत.
गटाराचे पाणी नागरिकांच्या घरात
“माझ्या प्रभागात ड्रेनेजमुळे लोकांच्या घरात पाणी जात आहे. सक्शन जेटिंग मशीन सुरू नसल्याने आणि ओपन गटार असल्याने पाणी वाहत आहे. नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आणि आरोग्य विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन मशीनची प्रत्यक्ष पाहणी करावी, ती त्वरित कार्यान्वित करावी आणि शहरातील ड्रेनेज स्वच्छतेसाठी तिचा नियमित वापर सुरू करावा, अशी मागणी असल्याचे नगरसेविका सावंत यांनी केली आहे. “जनतेच्या पैशातून खरेदी केलेली यंत्रसामग्री धूळखात पडण्यासाठी नव्हे, तर जनतेच्या सेवेसाठी वापरण्यासाठी आहे. याबाबत नगरप्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी,” अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.
Ans: दौंड नगरपरिषदेच्या आरोग्य विभागासाठी लाखो रुपये खर्चून खरेदी केलेली सक्शन कम जेटिंग मशीन मागील सहा महिन्यांपासून वॉटर ट्रीटमेंट प्लांट परिसरात वापराविना पडून असल्याने हा प्रश्न चर्चेत आला आहे.
Ans: मशीनची तातडीने पाहणी करून ती कार्यरत करावी आणि शहरातील ड्रेनेज स्वच्छतेसाठी नियमित वापर सुरू करावा, अशी मागणी स्वाती सावंत यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे. तसेच चालक, ऑपरेटर आणि आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
Ans: शहरातील ड्रेनेज लाईन तुंबणे, सांडपाण्याचा निचरा न होणे, अस्वच्छता आणि दुर्गंधीच्या समस्या निर्माण होत आहेत. काही ठिकाणी गटाराचे पाणी नागरिकांच्या घरात जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.






