शोएब अख्तरचे खळबळजनक विधान (फोटो- सोशल मिडिया)
एका पॉडकास्टमध्ये शोएब अख्तरने आधुनिक क्रिकेटच्या बदलत्या स्वरूपावर आणि प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडींवर भाष्य केले. नव्या पिढीचे लक्ष वेधून घेण्यामध्ये आणि दीर्घकाळ टिकवून ठेवण्यामध्ये क्रिकेटला सध्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये क्रिकेटचे आकर्षण हळू हळू कमी होत असल्याचे तसेच क्रिकेटच्या नियमांमध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या बदलांमुळे खेळातील नैसर्गिक समतोल आणि रोमांच कमी झाल्याचे शोएब अख्तरने म्हटले आहे.
U-19 Asia Cup: ‘Aggression दाखवा, मला आवडलं’, भारतीय संघाची शोएब अख्तरने थोपटली पाठ, केले मोठे विधान
‘आधुनिक क्रिकेट फलंदाजांची जास्त मदत करत असल्यासारखे दिसून येते. वेगवान गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या काळात शोएब अख्तर खूप प्रसिद्ध गोलंदाज म्हणून सर्वांच्या समोर आला होता. पाकिस्तान संघाचा मुख्य गोलंदाज म्हणून त्याची ओळख होती. त्याला रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते.
पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने खळबळ विधान केले आहे. नवीन पिढीला प्रेरणा देऊ शकतील आणि प्रभावित करू शकतील असे खेळाडू तयार करण्यात पाकिस्तान अपयशी ठरत असल्याचे अख्तरने म्हटले आहे. बाबा मला आपल्या पाकिस्तान संघात आक्रमकता दिसून येत नाही असे माझ्या मुलाने मला म्हटल्याचे अख्तरने सांगितले आहे.
नालायक Pakistan; शोएब अख्तरच्या भावाचे निधन, पण चर्चा ‘त्या’ खतरनाक दहशतवाद्याची, Video Viral
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने आपल्या पॉडकास्टमध्ये सॅंडपेपरबाबत देखील भाष्य केले आहे. बॉल टॅम्परिंग’च्या मुद्द्यावर त्याने मोकळेपणाने भाष्य केले आहे. बॉलचा आकार बदलण्यासाठी आणि रिव्हर्स स्विंग मिळवण्यासाठी खेळाडू त्या काळात बाटलीच्या झाकणांचा वापर करत असत, असे अख्तरने म्हटले. ऑस्ट्रेलियाच्या घटनेवर बोलताना त्याने या कृतींची माहिती सहसा पूर्ण संघाला माहिती असते. एक दोन खेळाडूंशी ते राहत नाही.
Ans: शोएब अख्तरच्या मते, गेल्या 20 वर्षांत क्रिकेटचे आकर्षण हळूहळू कमी होत आहे. युवा पिढीसह स्वतःच्या मुलांमध्येही या खेळाबद्दल पूर्वीसारखी उत्सुकता दिसत नसल्याचे त्याने म्हटले आहे.
Ans: आधुनिक क्रिकेटच्या नियमांमध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या बदलांमुळे खेळातील नैसर्गिक समतोल अन उत्साह कमी झाल्याचे मत शोएब अख्तरने व्यक्त केले आहे.






