खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नेहमी राजकीय पोस्ट शेअर करत चर्चेत असणारे अमोल कोल्हे आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. अमोल कोल्हे यांनी बाहुबली (Bahubali In Marathi) चित्रपटाच्या मराठी डबसाठी स्वत:चा आवाज दिला आहे. विशेष म्हणजे अमोल यांनी दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडेचे (Amol Kolhe Praised Snehal Tarde) आभार मानले आहे.
[read_also content=”मुंबई महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा, महाराष्ट्र महापौर परिषदेच्या पुरस्काराच्या शर्यतीत पटकावला पहिला क्रमांक https://www.navarashtra.com/maharashtra/bmc-received-first-rank-in-maharashtra-mahapaur-parishad-award-nrsr-259763.html”]
नुकतेच ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ हे दोन्ही चित्रपट मराठीत डब करण्यात आले. हे दोन्ही चित्रपट शेमारू मराठीबाणा या चॅनलवर प्रदर्शित करण्यात आले. या निमित्ताने एका मुलाखतीत अमोल कोल्हे यांनी प्रवीण तरडे यांच्या पत्नीचे आभार मानले आणि त्यांचा डबिंगचा प्रवास सांगत म्हणाले, “चित्रपट करताना खूप मज्जा आली. विशेषत: प्रवीण तरडेंच्या पत्नीचे कौतुक करेन. कारण त्यांनी या चित्रपटाचं मराठी रुपांतर केलं. चित्रपटाच्या मुळ गाभ्याला धक्का न देता त्यांनी ज्या क्षमतेनं काम केलं ते वाखाणण्याजोगं आहे.”
पुढे ते म्हणाले, “त्यांनी उत्तमरित्या काम केलं आहे. एवढंच नाही तर चित्रपटातील प्रत्येक शब्दाविषयी त्या आग्रही होत्या. कोणता शब्द कशा पद्धतीने हवा हे त्या वारंवार सांगायच्या. तर त्यांच्यामुळेच हे सगळं शक्य झालं आहे.”
दरम्यान, ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ नुकतेच डब केले आहेत. तर दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी चित्रपटाची कलात्मक बाजू सांभाळली आहे. तर चित्रपटासाठी डॉ. अमोल कोल्हे, गश्मीर महाजनी, मेघना एरंडे, सोनाली कुलकर्णी, उदय सबनीस, संस्कृती बालगुडे या कलाकारांनी त्यांचा आवाज दिला आहे.