राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर सुरु आहे. नदी नाल्याला पूर आला असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे. परळी तालुक्यातील कवडगाव हुडा येथील रस्त्यावरील नदीपात्रात काल रात्री एक कार वाहून गेली. या कारमध्ये चार जण होते,त्यापैकी तिघांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले असून एकाच मृत्यू झाला आहे. तर नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हासनाल गावातील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत.
पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?
परळी हुडा कौडगाव येथील पुलावरुन कार वाहून गेली
परळी हुडा कौडगाव येथील पुलावरून जात असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने फॉर व्हीलर गाडी पुलावरून नदीच्या पात्रात वाहून गेली. रात्री एक वाजताच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की दिग्रस येथील काही तरुण गाडीमधून जात असतांना कवडगाव हुडा येथे पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले आहेत. पाण्याचा अंदाज नसतानाही पोहण्याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे पोलिस मार्ग काढत रिक्षा घेऊन पाण्यात उतरले. दोर वापरून युवकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यापर्यंत दोर पोहोचत नव्हता, त्यामुळे पाण्यामध्ये जाऊन पोलिसांनी स्वत:च्या आणि त्या युवकाच्या कंबरेला दोर बांधून त्याला रात्रीच्या अंधारात बाहेर काढले. तिघा तरुणांना वाचवण्यत यश आले.
परंतू विशाल बल्लाळ हा पुणे येथील रहिवाशी असून त्याला पोहता येत नसल्यामुळे तो भयभीत झाल्याने कुठल्याही झाडाला पकडू शकला नाही. त्यामुळे तो एका बाभळीच्या झाडाला अडकलेला आढळून आला त्याची डेड बॉडी ताब्यात घेऊन पीएम करून त्याच्या नातेवाईकांकडे अंतिमसंस्कारसाठी पाठवून दिली आहे. तब्बल १२ तासानंतर विशाल बल्लाळ (वय 24) या तरुणाचा मृतदेह मिळाला. विशाल हा पुणे येथील रहिवाशी असून लग्नासाठी परळी येथे आला होता. पोलीस उपविभागीय अधिकारी ऋषिकेश शिंदे,सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहिफळे यांचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कौतुक केले आहे.
दोन महिलांचे मृतदेह सापडले
नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ गावातील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत. गंगाबाई मादळे आणि भीमाबाई मादळे यांचे मृतदेह सापडले आहे. अन्य चार ते पाच जणांचा शोध सुरू आहे.
मध्यरात्री दोन भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी
मध्यरात्रीच्या सुमारास दोन भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. पहिला अपघात चिपळूण कराड मार्गावर झाला आहे. या अपघातात ५ जण जागीच ठार झाल्याचे समोर आले आहे. तर दुसरा अपघात लातूर जिल्ह्यातील तावशी ताडा पाटी येथे घडला आहे. एका खाजगी प्रवासी बसने आयशर टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्याचे समोर आले आहे. अपघातावेळी बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते, दोन वाहक आणि एक सहाय्यक देखील यांच्यासोबत प्रवास करत होता. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहे.
गडचिरोली : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण, अश्लील व्हिडीओ वायरल करण्याची धमकी; दोघांना अटक