अभिनेत्र अंकिता लोखंडेच्या आयुष्यात अत्यंत दु:खद घटना घडली आहे. अंकिता लोखंडेचे (Ankita Lokhande) वडील शशिकांत लोखंडे (Shashikant Lokhande Passed Away) यांचं मुंबईत निधन झालं आहे. ते 68 वर्षांचे होते. अंकिताच्या वडिलांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी इंटरफेस अपार्टमेंटमध्ये ठेवण्यात आलं आहे. उद्या ओशिवरा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मात्र, अंकिता लोखंडेच्या वडिलांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. अंकिता तिच्या वडिलांच्या अत्यंत जवळ होती. वडिलांच्या निधनाने अंकिताला मोठा धक्का बसला आहे.
अंकिता लोखंडेने 2009 मध्ये एकता कपूरची मालिका ‘पवित्र रिश्ता’च्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरूवात केली आणि तिला खरी ओळख त्याच मालिकेतून मिळाली. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेमध्येच सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची ओळख झाली होती.
फक्त टीव्ही मालिकाच नाही तर अनेक हिट चित्रपटांमध्ये अंकिता लोखंडे ही महत्वाच्या भूमिकेमध्ये दिसली आहे. काही दिवसांपूर्वीच अंकिता लोखंडे ही पती विक्की जैन याच्यासोबत दुसऱ्यांदा लग्न करताना दिसली. याचे काही फोटोही अंकिता लोखंडे हिने सोशल मीडियावर शेअर केले होते. अंकिता लोखंडे हिच्या वडिलांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.