रस्ते अपघातात प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याचे निधन, अनेक मालिकांमध्ये साकारलीये मुख्य भूमिका
मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. अनेक टेलिव्हिजन मालिकांमधून महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झालेल्या अभिनेता संतोष हणमंत नलावडे याचं निधन झालं आहे. दरम्यान, टेलिव्हिजन अभिनेत्याचं नांदेडमध्ये रस्ते अपघातात निधन झाले आहे, तो ४९ वर्षांचा होता. अभिनेत्याच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर येताच त्याच्या चाहत्यांवर, नातेवाईकांवर आणि मित्रमंडळींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
संतोष नलावडे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात रेकॉर्ड विभागात नोकरीला होते. नांदेडमध्ये तो विभागीय महसुल क्रीडा स्पर्धेसाठी गेले असताना त्यांचा तिथे रस्ते अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना सोमवारी (२४ फेब्रुवारी) दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर वाढे (ता. सातारा) या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे असल्याने त्यांचा मित्र परिवार मोठा होता.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला का? दबाव असल्याची खासदार अमोल कोल्हेंची कबुली
दरम्यान, संतोष नलावडे यांच्या फिल्मी करियरबद्दल बोलायचं तर, त्यांनी आपल्या अभिनय करियरची सुरुवात ‘हौशी’ नाटकांपासून केली. त्यानंतर त्यांनी ‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘शेतकरी नवरा हवा’, ‘लाखात एक आमचा दादा’, ‘मन झालं बाजींद’, ‘कॉन्स्टेबल मंजू’, ‘लागीरं झालं जी’ सह आदी मालिकेंमध्ये संतोषने सहकलकार म्हणून काम केलं आहे. या शिवाय काही मराठी चित्रपटांमध्येही अभिनेत्याने काम केलं आहे. अभिनेत्याच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.