(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री आणि यूट्युबर प्राजक्ता कोळीने अखेर तिचा बॉयफ्रेंड वृषांकसोबत सोबत लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्री तिच्या नेपाळी बॉयफ्रेंडला गेल्या १३ वर्षांपासून डेट करीत आहे. आणि आता या दोघांनी लग्न केले असून चाहत्यांना खुश करून टाकले आहे. तसेच वृषांक आणि प्राजक्ताचा दोन वर्षांपूर्वीच साखरपुडा झाला होता. आणि आता देवाच्या साक्षीने ते एकमेकांचे सोबती झाले आहेत. या जोडप्यांची आहे २५ फेब्रुवारी २०२५ रोजी लग्न करून चाहत्यांना आनंदी करून टाकले आहे. तसेच प्राजक्ताने तिच्या लग्ना आधीचे फोटोस आता सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे पाहून चाहते चकित झाले आहेत.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला का? दबाव असल्याची खासदार अमोल कोल्हेंची कबुली
प्राजक्ता आणि वृषांकचा हटके लूक
प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोमध्ये लाल रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच वृषांकने काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. फोटोमध्ये दोघेही खूप आनंदी आणि एन्जॉय करताना दिसत आहे. दोघांच्या फोटोला आहे चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्राजक्ता आणि वृषांक या दोघांची जोडी लोकांना आवडू लागली आहे. त्यांना चाहते खूप प्रेम देत आहेत.
रस्ते अपघातात प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याचे निधन, अनेक मालिकांमध्ये साकारलीये मुख्य भूमिका
या जोडप्याचा लग्न सोहळा जवळचे कुटुंब आणि मित्र यांच्या उपस्थितने पार पडला आहे. प्राजक्ता आणि वृषांक अनेक वर्षांपासून डेटिंग करत आहेत आणि २०२३ मध्ये त्यांनी त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली. प्राजक्ता प्रसिद्धी मिळवण्यापूर्वीपासूनच हे जोडपे एकत्र होते. अलिकडेच, या जोडप्याने त्यांच्या मेहंदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत ज्यात प्राजक्ताने एक आकर्षक लाल सूट घातला होता तर वृषांकने पांढरा कुर्ता पायजमा निवडला होता. नंतर, प्राजक्ताने तिच्या हळदी सोहळ्याचे गोंडस फोटोज चाहत्यांसह शेअर केले. जे चाहत्यांना खूप आवडले. व्यावसायिकदृष्ट्या, प्राजक्ता अलीकडेच तिच्या ‘मिसमॅच्ड’ वेब सिरीजच्या तिसऱ्या सीझनमध्ये रोहित सराफसोबत दिसली. ही मालिका नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यासाठी उपलब्ध आहे.