Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैत्री, स्वप्नं आणि मे महिन्याच्या सुट्टीतील कल्ला; तरुणांचे भावविश्व दाखवणारा ‘एप्रिल मे ९९’चा हटके पोस्टर रिलीज

रोहन मापुस्कर दिग्दर्शित 'एप्रिल मे ९९' चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये चार तरुण त्यांच्या सायकलींसोबत उभे असल्याचे दिसते. या तरुणांच्या वर निळेशार आकाश आणि समोर समुद्र पाहायला मिळत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 24, 2025 | 04:06 PM
मैत्री, स्वप्नं आणि मे महिन्याच्या सुट्टीतील कल्ला; तरुणांचे भावविश्व दाखवणारा 'एप्रिल मे ९९'चा हटके पोस्टर रिलीज

मैत्री, स्वप्नं आणि मे महिन्याच्या सुट्टीतील कल्ला; तरुणांचे भावविश्व दाखवणारा 'एप्रिल मे ९९'चा हटके पोस्टर रिलीज

Follow Us
Close
Follow Us:

मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक-निर्माते राजेश मापुस्कर आणि कास्टिंगच्या दुनियेत बादशाह म्हणून ओळखले जाणारे रोहन मापुस्कर हे दोघे भाऊ एकत्र येऊन प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन आले आहेत.

मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स , थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणजे, १६ मे २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्गज दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते करण्यात आले ह्या प्रसंगी निर्माते जोगेश भूटानी ह्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन राजदत्त ह्यांचा सत्कार करून आशीर्वाद घेतले.

“या भावनांना शब्दात नाही मांडू शकत…” जुनैदचा ‘लव्हयापा’ सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानची पहिल्यांदा प्रतिक्रिया

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये चार तरुण त्यांच्या सायकलींसोबत उभे असल्याचे दिसते. या तरुणांच्या वर निळेशार आकाश आणि समोर समुद्र पाहायला मिळत आहे. पोस्टरवरून असे दिसते की, हा चित्रपट प्रेक्षकांना मैत्री, स्वप्नं, आणि तारुण्याच्या भावविश्वात घेऊन जाणारा असेल. ‘एप्रिल मे ९९’ असे नाव असल्याने हा चित्रपट उन्हाळ्याच्या सुट्टीतील कुटुंबातील लहान मोठ्या सर्वांच्या सुट्टीतील रम्य आठवणींशी जोडला जाणार आहे. चित्रपटात कलाकार कोण असतील? हे अजून गुलदस्त्यातच आहे.

निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात,” श्रीवर्धनमध्ये आमचा मापुस्कर कुटुंबाचा एक सिनेमा हॉल होता. तो सिनेमा हॉल आम्हा दोन भावांसाठी जणू एक चित्रपट शाळाच ठरला. तिथे राजदत्त जींचे चित्रपट पाहत आम्ही मोठे झालो आणि इतकेच नाही तर आम्ही त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचे पोस्टर श्रीवर्धन आणि आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन चिकटवायचो. आज आम्ही राजदत्त जींच्या हस्ते रोहनच्या पहिल्या चित्रपटाचे ‘एप्रिल मे ९९’ चे पोस्टर रिलीज करत आहोत. यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता असू शकतो? त्यांच्या शुभेच्छांमुळे आमच्या प्रवासाला एक वेगळे बळ मिळाले असून त्यांचे हे आशीर्वाद आम्हाला कायम प्रेरित करतील.”

‘पारु’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती, आलिशान घरात गृहप्रवेश करतानाचे शेअर केले Photos

लेखक, दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात,” आज मी दिग्दर्शक म्हणून माझ्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर माननीय राजदत्तजी यांच्या हस्ते प्रदर्शित करतोय ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या प्रवासात आम्ही अनुभवलेले क्षण, चित्रपटांची जादू आणि कलेची आस हे सर्व एकत्र होऊन या नव्या प्रकल्पाला आकार देत आहेत. नेहमी प्रमाणे प्रेक्षकांच्या प्रेमाने या चित्रपटाला पुन्हा पाठिंबा मिळेल, अशी खात्री आहे. राजदत्त सरांचे आशीर्वाद आम्हाला पुढील प्रवासासाठी उर्जा देतील याची मला पूर्ण खात्री आहे.”

मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स , थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत.

Web Title: April may 99 marathi movie poster has been released on social media this film release on may 16th

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 02:28 PM

Topics:  

  • marathi film
  • Marathi Movie News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.