झी मराठीवरील ‘पारू’ मालिकेची कायमच प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत असते. ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत पाहायला मिळत असून कायमच चर्चेत राहणारीही मालिका आहे. मालिकेप्रमाणेच त्यातील कलाकारही सध्या चर्चेत आले आहे. मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या श्वेता खरातने चाहत्यांना 'गुड न्यूज' दिली आहे.
Paaru Fame Actress Shweta Kharat Buy New House
मालिकेमध्ये अनुष्का हे खलनायीकी पात्र साकारणाऱ्या अनुष्का खरातने चाहत्यांना काही फोटोज् शेअर करत 'गुड न्यूज' दिली आहे. श्वेताने नवीन आलिशान घर खरेदी केल्याची बातमी तिने चाहत्यांना सोशल मीडियावरून दिली आहे.
दरम्यान, काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर नवीन घरातील गृहप्रवेशाचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने गृहप्रवेशाचे फोटो शेअर करताच चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे..
गृहप्रवेशाच्या दिवशी श्वेताने खास लूक केला होता. तिने केशरी रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. श्वेताच्या नवीन घराच्या गृहप्रवेशाला ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्या दादा म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाणने खास हजेरी लावली होती.
श्वेताचे आई, बाबा, भाऊ यांनी नवीन घर घेताच घरात पूजा केली. श्वेताच्या बाबांनी सर्वांसोबत गृहप्रवेश केला. श्वेताने घरात कुटुंबासोबत खास फोटोसेशन केलं. श्वेताने घर घेताच सोशल मीडियावर चाहत्यांनी आणि तिच्या सेलिब्रिटी मित्रांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय.
'राजा रानीची गं जोडी' मालिकेतून टिव्ही इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या श्वेताने मालिकेत साकारलेली छोटीशी भूमिका प्रचंड गाजली. या मालिकेनंतर झी मराठीवरील 'मन झालं बाजिंद' मालिकेत श्वेता प्रमुख भूमिकेत होती.