बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमचा चित्रपट ‘आर्टिकल 370’ ला प्रेक्षकांसह समिक्षकांचीही पंसती मिळत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस झाले आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने 25.45 कोटीचा व्यवसाय केला. मात्र, आता चित्रपटाबद्दल एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. रिपोर्ट नुसार, ‘आर्टिकल 370’ वर सर्व आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.
[read_also content=”सिनेप्रेमींसाठी खुशखबर! मुंबईतील ‘या’ मेट्रो स्थानकाखाली उभारलं जाणार ‘बॉलिवूड थीम पार्क’ https://www.navarashtra.com/movies/bollywood-theme-park-under-the-metro-line-b2-in-mumbai-nrps-510500.html”]
यामी गौतमच्या आर्टिकल 370 या चित्रपटाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या कमाईचा आलेख खूप वेगाने वर जात आहे. एकीकडे हा चित्रपट कलेक्शनच्या बाबतीत आश्चर्यकारक कामगिरी करत असताना दुसरीकडे आखाती देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. आखाती देशांना भारतातून मिळणारे पर्यटन आणि तेथे दररोज बॉलीवूड चित्रपटांचे चित्रीकरण लक्षात घेता हा बंदीचा निर्णय आश्चर्यकारक मानला जात आहे.
आखाती देशांमध्ये बॉलीवूड चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा येथे चांगला चाहतावर्ग आहे. याआधी हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘फाइटर’ या चित्रपटावर UAE वगळता सर्व आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली होती. आता आर्टिकल 370 बंदी घालण्यात आल्याने त्याचा कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच त्यांच्या जम्मू दौऱ्यात एका मोठ्या सभेला संबोधित करताना या चित्रपटाचा उल्लेख केला होता. या चित्रपटाची कथा कलम ३७० अंतर्गत जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकण्यासाठी झालेल्या लढ्याची आहे. या चित्रपटाचा संदर्भ देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मी ऐकले आहे की या आठवड्यात कलम 370 वर एक चित्रपट येत आहे. चित्रपट कसा आहे हे मला माहित नाही, परंतु मी ऐकले आहे. हे चांगले आहे, लोकांना योग्य माहिती मिळविण्यात मदत होईल.






