एर्लिंग हालांड(फोटो-सोशल मीडिया)
Erling Haaland broke Cristiano Ronaldo’s record : २०२५ चा इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) हंगाम आतापर्यंत चांगलाच रोमांचक आणि स्पर्धात्मक राहिलेला दिसून येत आहे. या हंगामात मँचेस्टर सिटीचा स्टार स्ट्रायकर एर्लिंग हालांडने आपली प्रभावी कामगिरी सुरूच ठेवली आहे. त्याने या हंगामात इतिहासही रचला आहे. या महिन्यात दोन गोल करून प्रीमियर लीगच्या सर्वकालीन सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हालांडने क्रिस्टियानो रोनाल्डोला पिछाडीवर ठेवले आहे. हालांडची कामगिरी मँचेस्टर सिटी संघसाठी महत्त्वाची ठरली आहे. कारण त्याने त्याच्या संघाला आरामदायी विजय मिळवून दिला आणि त्यांची विजयी मालिका पाच सामन्यांपर्यंत पोहचवली आहे.
हेही वाचा : मिचेल स्टार्कने 2025 मध्ये जेम्स अँडरसन आणि शॉन पोलॉक यांना टाकलं मागे, नवा विक्रम केला नावावर
मँचेस्टर सिटीने वेस्ट हॅमचा ३-० असा दारुण पराभव केला, ज्यामध्ये एर्लिंग हालांडने केलेल्या दोन गोलने महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयाने सिटीला तीन गुण प्राप्त झाले. परंतु ख्रिसमसच्या दिवशी आर्सेनलला प्रीमियर लीगमध्ये पहिले स्थान मिळवण्यापासून रोखता आले नाही. आर्सेनलने एव्हर्टनचा १-० असा पराभव केला. या विजयासह, २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या दिवशी आर्सेनलने पाचव्यांदा लीगमध्ये पहिले स्थान पटकावणार आहे. याचा अर्थ आर्सेनलला विजेतेपद जिंकणार असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. आर्सेनलकडे सध्या पाच गुणांची आघाडी आहे, तर मँचेस्टर सिटी त्यांच्यापेक्षा फक्त दोन गुणांनी पिछाडीवर आहेत.
हॉलंडची ऐतिहासिक कामगिरी
एर्लिंग हालांडने या हंगामात आपल्या शानदार कामगिरीने सर्वांना चकित केल आहे. त्याने मँचेस्टर सिटीसाठी दोन गोल केले, ज्यामुळे या हंगामात त्याचे गोल संख्या १९ वर जाऊन पोहचली आहे. उल्लेखनीय बाबम्हणजे, हालांडने आतापर्यंत १७ सामन्यांमध्ये हे गोल साधले आहेत. या काळात, त्याने प्रीमियर लीगमध्ये १०४ गोल करण्याची किमया साधली आहे, ज्यामुळे तो क्रिस्टियानो रोनाल्डोपेक्षा एक गोल पुढे देखील गेला आहे.
हेही वाचा : U19 Asia Cup 2025 : टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या…! समीर मिन्हासने भारताविरुद्ध ठोकले शतक
रोनाल्डोने त्याच्या प्रीमियर लीग कारकिर्दीमध्ये १०३ गोल डागले आहेत. हालांडने आता प्रीमियर लीगच्या सर्वकालीन आघाडीच्या गोलस्कोअरर यादीमध्ये रोनाल्डोला मागे टाकले आहे. हालांडचा गोलस्कोअरिंग रेकॉर्ड केवळ मँचेस्टर सिटीसाठीच नाही तर नॉर्वेसाठीही महत्त्वपूर्ण असणार आहे. या हंगामात, हालांडने २८ सामन्यांमध्ये ३८ गोल केले आहेत, जे त्याच्यासाठी आणखी एक वैयक्तिक कामगिरी दर्शवत आहे.






