Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रामायण’ मालिकेतील ‘राम-सीता’ पुन्हा एकत्र, दिसणार नव्या भूमिकेत; वाचा सविस्तर

‘राम-सीता’च्या जोडीची प्रत्येक घराघरांत-मनामनांत अफाट लोकप्रियता असून त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता येणार आहे. लवकरच ‘वीर मुरारबाजी’ हा चित्रपट रिलीज होणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 05, 2025 | 05:07 PM
'रामायण' मालिकेतील ‘राम-सीता’ पुन्हा एकत्र, दिसणार नव्या भूमिकेत; वाचा सविस्तर

'रामायण' मालिकेतील ‘राम-सीता’ पुन्हा एकत्र, दिसणार नव्या भूमिकेत; वाचा सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

‘रामायण’ मालिकेमध्ये प्रभू श्री रामांची आणि माता सीतेची भूमिका साकारलेल्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मालिकेमध्ये प्रभू श्री रामांची भूमिका अभिनेते आणि खासदार अरुण गोविल यांनी साकारलीये. तर सीता मातेची भूमिका अभिनेत्री दीपिका चिखलीयाने साकारली होती. मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली ही ‘राम-सीता’ची जोडी आता चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच ‘वीर मुरारबाजी’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. ‘राम-सीता’च्या जोडीची प्रत्येक घराघरांत-मनामनांत अफाट लोकप्रियता असून त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता येणार आहे.

‘वादळवाट’ फेम अभिनेते डॉ. विलास उजवणे यांच्या निधनावर मराठी कलाकारांची प्रतिक्रिया, वाहिली श्रद्धांजली

श्रीरामनवमीच्या शुभमुहूर्तावर ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटातलं पोस्टर रिलीज झाले आहे. ‘राम-सीता’ची भूमिकेत असलेल्या अभिनेते- खासदार अरुण गोविल आणि अभिनेत्री दीपिका चिखलीयाचे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झाले आहे. श्रीरामनवमीच्या शुभमुहूर्तावर ‘राम-सीता’ची भूमिकेत असलेल्या कलाकारांचे एक आकर्षक पोस्टर प्रदर्शित झाले आहे. ‘वीर मुरारबाजी… पुरंदरकी युद्धगाथा’ या महत्त्वाकांक्षी हिंदी चित्रपटात ही जोडी छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. भाऊसाहेब आरेकर यांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे तर दिग्दर्शन अजय-अनिरुद्ध यांनी केले आहे.

“सिद्धहस्त कलाकार आपल्यातून दूर गेला…” अभिनेते डॉ. विलास उजवणे यांच्या निधनावर उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

ऐतिहासिक चित्रपटात एकत्रित काम करण्याचा योग या निमित्ताने जुळून आला असून या भूमिकेसाठी आम्ही तितकेच उत्सुक होतो, असं हे दोघे सांगतात. छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांची भूमिका करायला मिळणं आमच्यासाठी खूपच आनंददायी होतं. ज्या उत्तुंग व्यक्तिमत्वांनी आपला प्रेरणादायी इतिहास घडवला, समाजाला नवा विचार दिला, अशी भूमिका साकारताना सोबत मोठी सामाजिक जबाबदारी नक्कीच असते, असं प्रांजळ मत या दोघांनी व्यक्त केलं.

अभिनेते मनोज कुमार अनंतात विलीन, ‘भारत कुमार’ याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी

पुरंदरच्या वेढ्याप्रसंगी झालेल्या धुमश्चक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ नरवीर मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रमी इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा ‘वीर मुरारबाजी…पुरंदरकी युद्धगाथा’ या चित्रपटातून रुपेरी पडदयावर येण्यासाठी सज्ज होत असून लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा होणार आहे.

Web Title: Arun govil deepika chikhliya to play chhatrapati shahajiraje jijau in veer murarbaji movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 05:07 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Film
  • Bollywood News
  • Entertainment News

संबंधित बातम्या

‘कलाम वाचा, तिने महापाप केलं..’, कपाळावर चंदनाचा लेप लावून नुशरत भरुचाने केला महाकाल मंदिरात प्रवेश, भडकले मौलाना..
1

‘कलाम वाचा, तिने महापाप केलं..’, कपाळावर चंदनाचा लेप लावून नुशरत भरुचाने केला महाकाल मंदिरात प्रवेश, भडकले मौलाना..

‘अजून चेहरा रिव्हिल केला नाही, आणि…’, भारती सिंगचा मुलगा काजूचा Ai Photo व्हायरल, संतापली कॉमेडियन
2

‘अजून चेहरा रिव्हिल केला नाही, आणि…’, भारती सिंगचा मुलगा काजूचा Ai Photo व्हायरल, संतापली कॉमेडियन

‘हे खूप घृणास्पद…’ Tara Sutaria ला बदनाम करण्यासाठी इन्फ्लुएन्सरना मिळाले ६,००० रुपये, गुपित झाले उघड
3

‘हे खूप घृणास्पद…’ Tara Sutaria ला बदनाम करण्यासाठी इन्फ्लुएन्सरना मिळाले ६,००० रुपये, गुपित झाले उघड

हॉलिवूड अभिनेते Isiah Whitlock Jr यांचे वयाच्या ७१ व्या निधन, The Wire चित्रपटातून मिळाली प्रसिद्धी
4

हॉलिवूड अभिनेते Isiah Whitlock Jr यांचे वयाच्या ७१ व्या निधन, The Wire चित्रपटातून मिळाली प्रसिद्धी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.